आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत पुन्हा चॅम्पियन बनेल ... ? धोनी दोन वेळा किताब जिंकणार काय ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत पुन्हा चॅम्पियन बनेल काय व धोनी दोन विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार होईल काय ? वर्ल्डकप सुरू होताना तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनात हेच प्रश्न असतील. आतापर्यंत फक्त दोन कर्णधारांनी (वेस्ट इंडीजचे क्लाइव्ह लॉइड व ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग) यांनी दोन वेळा किताब जिंकला आहे. या दोघांची बरोबरी करण्याची संधी धोनीकडे असेल.
पाहा कर्णधारांचे खास विक्रम :
पाँटिंग सर्वाधिक यशस्वी

सर्वाधिक २९ सामन्यांत नेतृत्व केले आणि सर्वाधिक २६ सामने जिंकले. भारताकडून अझरुद्दीनने सर्वाधिक २३ सामन्यांत नेतृत्व केले. मात्र, फक्त १० मध्ये विजय मिळाला.

मेंडिस सर्वाधिक अपयशी
श्रीलंकेच्या दिलीप मेंडिस यांनी १२ सामन्यांत नेतृत्व केले. मात्र, फक्त एकच विजय मिळाला. विजयाची सरासरी ८.३ इतकी. पाचपेक्षा अधिक सामने खेळणाऱ्यांत सर्वात कमी.
पुढील स्‍लाइडवर वाचा, काही भन्‍नाट विक्रम...