आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Will Win World Cup 2015 Says Virendra Sehawagh

बाऊन्सर्सवर बंदी आल्यास गोलंदाजांचे मुख्य अस्त्रच नाहीसे होईल – सेहवाग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - फिलिप हय़ुजच्या दुदैवी निधनानंतर क्रिकेट जगतातामध्ये बाऊंससर्वर बंदी आणावी असे काही जणांनी मत व्‍यक्‍त केले. परंतु, बाऊंसर्सवर बंदी आणल्‍यास तो खेळ फक्‍त फलंदाजांचा होईल. गोलंदाजांचे मुख्‍या अस्‍त्रच नाहीसे होईल, असे मत भारताचा स्‍फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने व्‍यक्‍त केले आहे. तो मुंबईमध्‍ये बोलत होता.
ICC विश्वचषक मुंबईत दाखल झाला असून त्यानिमित्त मनीग्रामने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सेहवागने आपले मत मांडले.
काय म्‍हणाला वीरु ?
सेहवाग म्‍हणाला की, ‘पुल शॉट खेळताना डोक्याला गंभीर इजा झाल्याने हय़ुजचा दुर्दैवी मृत्यू झाला, ही घटना अतिशय दुःखद आहे. क्रिकेटजीवनाचा तो एक भाग असून कोणत्याही खेळात खेळाडूंना दुखापतींना तोंड द्यावेच लागते. त्यात मृत्यूही होऊ शकतो. मात्र उसळत्या चेंडूना फलंदाजांजवळ पर्याय असतात. खेळण्‍याची एक शैली असते. बाऊन्सर्सवर बंदी घातली तर क्रिकेटमधील मजाच निघून जाईल. बाऊन्‍सर चेंडू खेळण्याची मलाही समस्या आहे. त्यामुळे असे चेंडू अनेकदा माझ्या हेल्मेटला लागले आहेत.
भारतच जिंकेल विश्‍वचषक
मनीग्रामने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सेहवाग म्‍हणाला की, भारतीय संघात आगामी विश्वचषक स्वतःकडेच राखण्याची क्षमता आहे. यावर्षीचा विश्‍वचषकाचा दावेदार भारतच असणार आहे.
सेहवागचे करिअर
तडाखेबंद फलंदाजीसाठी ओळखल्‍या जाणात्‍या फलंदाजांपैकी सेहवाग आहे. त्‍याने 104 कसोटी व 251 एकदिवसीय सामन्‍यात 8000 हून अधिक धावा करताना उच्च स्ट्राईक रेट ठेवला आहे.