आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India Win Test Series V S Australia Test Series, 4th Test Delhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बोट दाखवल्याने इशांतला दंड, जडेजाला समज, सचिनने केली मधस्थी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रवींद्र जडेजाची अष्टपैलू कामगिरी आणि चेतेश्वर पुजाराच्या दमदार फलंदाजीच्या बळावर भारताने चौथ्या कसोटीच्या तिसर्‍या दिवशीच ऑस्ट्रेलियाला 6 गड्यांनी पराभूत केले. विजयासाठी मिळालेल्या 155 धावांचा पाठलाग करताना भारताने 4 विकेट गमावून हे लक्ष्य गाठले. या विजयासह भारताने ही मालिका 4-0 ने आपल्या नावे केली.
सामन्याच्या तिसर्‍या दिवशी भारताचा पहिला डाव 272 धावांत आटोपला. टीम इंडियाला फक्त 10 धावांची आघाडी मिळाली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन फलंदाजांना दुसर्‍या डावात 200 धावासुद्धा काढता आल्या नाही. कांगारूंचा दुसरा डाव 164 धावांत आटोपला. यानंतर भारताने 31.2 षटकांत 4 बाद 158 धावा काढून मालिका आपल्या नावे केली.

इशांतला दंड, जडेजाला समज अन् सचिनची मध्यस्थी- पॅटिन्सला बाद केल्यानंतर उत्साहाच्या भरात त्याला पॅव्हेलियनकडे जाण्याचा केलेला इशारा वेगवान गोलंदाज ईशांतला चांगलाच महाग पडला. हा इशारा आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग मानत सामनाधिकारी रंजन मदुगले यांनी ईशांतला सामनानिधीच्या 15 टक्के कपातीच्या दंडाची शिक्षा केली. त्याचवेळी रविंद्र जडेजाने डेविड वॉर्नरला पायचित केल्यानंतर त्याला जडेजाने पव्हेलियनकडे जाण्याचा इशारा केला. त्यावेळी पंचानी जडेजाला समज दिली. लेगअंपायरने अशी चूक पुन्हा करु नको असे फर्मान काढताच या दोघांच्या मध्ये सचिन आला व त्याने जडेजाला शांत राहण्यास सांगितले. त्यानंतर जडेजा शांत झाला व पंचही आपल्या जागेवर गेले.

1920 मध्ये पहिल्यांदा क्लीन स्वीप
इतिहासात कोणत्याही संघास क्लीन स्वीप देण्याचा पराक्रम ऑस्ट्रेलिया संघाने 1920 मध्ये पहिल्यांदा केला. त्या वेळी ऑस्ट्रेलियन कर्णधार वॉर्विक आर्मस्ट्राँगने इंग्लंडला नमवून हा इतिहास रचला होता. त्या वेळी इंग्लंडचे नेतृत्व जॉनी डग्लसच्या हाती होती.

सिडलची दोन्ही डावांत अर्धशतके
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन एका सामन्याच्या दोन्ही डावांत अर्धशतक ठोकणारा पीटर सिडल पहिला फलंदाज ठरला आहे. पहिल्या डावात त्याने 51 तर दुसर्‍या डावात 50 धावा काढल्या. दोन्ही डावात ऑस्ट्रेलियाकडून तो टॉप स्कोअरर ठरला, हे विशेष. भारताकडून आर. अश्विनने मालिकेत सर्वाधिक 29 बळी घेतले.

तिसर्‍या दिवशी 16 विकेट
कोटलाची खेळपट्टी फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरली. तिसर्‍या दिवशी या खेळपट्टीवर तब्बल 16 फलंदाज बाद झाले. पहिल्या दिवशी 8, दुसर्‍या दिवशी 10 फलंदाज बाद झाले. सामन्यात एकूण 34 गडी बाद झाले. यातील 29 गडी फिरकीपटूंनी टिपले.

कोटलावर 12 कसोटी विजय
फिरोजशहा कोटलाच्या मैदानावर भारताने 12 कसोटी विजय मिळवले आहे. भारतात सर्वाधिक विजय मिळवणार्‍या एम. ए. चिदंबरम स्टेडियम (13 विजय) कोटला हे दुसरे यशस्वी स्टेडियम ठरले आहे. कोटलावर मागच्या दहा लढतीत भारताने 9 विजय आणि एक सामना ड्रॉ केला.

धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव 262.
भारत पहिला डाव धावा चेंडू 4 6
(कालच्या 8 बाद 266 वरून पुढे)
भुवनेश्वर नाबाद 14 23 2 0
ईशांत त्रि. गो. लॉयन 0 6 0 0
ओझा पायचीत गो. लॉयन 0 1 0 0
अवांतर : 30. एकूण : 70.2 षटकांत सर्वबाद 272. गडी बाद होण्याचा क्रम : 1-108, 2-114, 3-148, 4-165, 5-180, 6-210, 7-254, 8-266, 9-272, 10-272. गोलंदाजी : जॉन्सन 17-3-44-0, जेम्स पॅटिन्सन 14-1-54-1, सिडल 12-3-38-1, नॅथन लॉयन 23.2-4-94-7, मॅक्सवेल 4-0-12-1.
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव धावा चेंडू 4 6
वॉर्नर पायचीत गो. जडेजा 8 15 1 0
मॅक्सवेल त्रि. गो. जडेजा 8 14 1 0
कोवान पायचीत गो. जडेजा 24 44 5 0
ह्युजेस पायचीत गो. अश्विन 6 23 0 0
वॉटसन त्रि. गो. ओझा 5 11 1 0
स्मिथ त्रि. गो. जडेजा 18 53 1 0
वेड झे. धोनी गो. ओझा 19 38 2 0
जॉन्सन त्रि. गो. जडेजा 0 1 0 0
सिडल यष्टिचीत गो. अश्विन 50 45 7 0
पॅटिसन त्रि. गो. ईशांत 11 28 1 0
लॉयन नाबाद 5 7 1 0
अवांतर : 10. एकूण : 46.3 षटकांत सर्वबाद 164 धावा. गडी बाद होण्याचा क्रम : 1-15, 2-20, 3-41, 4-51, 5-53, 6-94, 7-94, 8-122, 9-157, 10-164. गोलंदाजी : भुवनेश्वर 2-0-9-0, आर. अश्विन 15.3-2-55-2, रवींद्र जडेजा 16-2-58-5, ओझा 11-2-19-2, ईशांत 2-0-13-1.
भारत दुसरा डाव धावा चेंडू 4 6
विजय त्रि. गो. मॅक्सवेल 11 12 2 0
चेतेश्वर पुजारा नाबाद 82 92 11 0
कोहली पायचीत गो. लॉयन 41 60 4 0
सचिन पायचीत गो. लॉयन 1 5 0 0
रहाणे झे. लॉयन गो. मॅक्सवेल 1 5 0 0
महेंद्रसिंग धोनी नाबाद 12 14 2 0
अवांतर : 10. एकूण : 31.2 षटकांत 4 बाद 158 धावा. गडी बाद होण्याचा क्रम : 1-19, 2-123, 3-127, 4-128. गोलंदाजी : लॉयन 15.2-0-71-2, मॅक्सवेल 11-0-54-2, जॉन्सन 2-0-16-0, पॅटिन्सन 3-0-7-0.
सामनावीर : रवींद्र जडेजा. मालिकावीर : अश्विन.