आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India Win Two Gold Medals In Achary And Squash, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताला तिरंदाजी, स्क्वॅशमध्ये सुवर्णयश!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन - सतराव्या एशियन गेम्सच्या आठव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी कमाल कामगिरी केली. स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताने तब्बल ११ पदकांची कमाई केली. तिरंदाजी आणि स्क्वॅशमध्ये भारताला प्रत्येकी एक सुवर्णपदक मिळाले. याच खेळात भारताने प्रत्येकी एक रौप्यपदकही जिंकले. याशिवाय तिरंदाजीत २ कांस्य, कुस्तीत २ कांस्य आणि नेमबाजीत एक कांस्यपदक मिळवले. सायंकाळी अडथळ्यांच्या शर्यतीत भारतीय महिलांनी एक रौप्य, एक कांस्य जिंकले.

अचूक तिरंदाज
पुरुष गटात भारतीय त्रिकूट रजत चौहान, संदीप कुमार आणि अभिषेक वर्मा यांनी कम्पाउंड टीम स्पर्धेत यजमान द. कोरियाला २२७-२२५ अशा अवघ्या २ गुणांनी पराभूत करून सुवर्णपदक जिंकले. अभिषेक वर्माने पुरुषांच्या कम्पाउंड वैयक्तिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. याशिवाय तृषा देव, पूर्वशा शिंदे आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांच्या महिला कम्पाउंड संघाने कांस्य मिळवले. तसेच तृषाने वैयक्तिक कांस्यपदकही जिंकले.

अभिषेकचा रौप्यवर नेम : पुरुषांच्या वैयक्तिक सुवर्णपदकाच्या सामन्यात अभिषेक वर्माला इराणच्या इस्माईल अबादीने १४१-१४५ अंतराने पराभूत केले. यामुळे अभिषेकला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

तृषा देवला कांस्य : महिलांच्या कम्पाउंड वैयक्तिक स्पर्धेत भारताच्या तृषा देवने चिनी तैयपैच्या होंग जोऊला १३८-१३४ ने पराभूत करून कांस्यपदक मिळवले. चीन तैयपैच्या तिरंदाज खेळाडूने ८ वेळा परफेक्ट टेनचा स्कोअर केला. होंगचा अखेरचा नेम चुकला, याचा फायदा तृषाला झाला.

टीम स्पर्धेत कांस्य : टीम स्पर्धेत महिला गटात तृषा देव, पूर्वशा शिंदे आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांच्या महिला कम्पाउंड संघाने इराणला २२४-११७ ने पराभूत करून कांस्यपदक मिळवले. दोन्ही संघांनी प्रत्येकी ९ टेनचा स्कोअर केला होता. या स्पर्धेतील सुवर्णपदक यजमान द. कोरियाने, तर रौप्यपदक चीनने मिळवले.

असे मिळाले सुवर्ण यश
भारतीय तिरंदाजांनी चांगली सुरुवात केली. दुसरीकडे घरचेच वातावरण असताना चोई होंग ही, मिन ली होंग आणि यांग योंग यांच्या कोरियन संघाचा नेम वारंवार चुकला. इराणने फ‍िलिपाइन्सला २२७-२२४ ने पराभूत करून कांस्यपदक जिंकले.
स्क्वॅशमध्ये दुर्गाशक्तीला रौप्यपदक
स्क्वॅशमध्ये भारताची कामगिरी : एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदक
भारतीय पुरुष स्क्वॅश संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना मलेशियाला २-० ने पराभूत करून स्पर्धेतील सुवर्णपदक जिंकले. भारतीय महिला स्क्वॅश संघाला फायनलमध्ये मलेशियाकडून पराभवाचा सामना करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सुवर्णसंधी थोडक्याने हुकली.

हरिंदरपाल सिंग संधू, सौरभ घोषाल आणि महेश मनगावकर यांच्या भारतीय संघाने देशाला स्क्वॅशमध्ये एशियन गेम्सच्या इतिहासात पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. हरिंदर आणि घोषाल यांनी आपापले सामने जिंकून भारताला २-० अशी अजेय आघाडी मिळवून दिली. यानंतर तिसरा सामना खेळण्याची गरजच राहिली नाही. हरिंदरने मलेशियाच्या मोहंमद अजलान बिन इस्कंदरला ५८ मिनिटांत ११-८, ११-६, ८-११, ११-४ ने हरवत १-० ने आघाडी मिळवून दिली. घोषालने दुस-या सामन्यात बेंग ही ओंगला पराभूत केले. घोषालला हा सामना जिंकण्यासाठी तब्बल ८८ मिनिटे संघर्ष करावा लागला. घोषालने हा महत्त्वपूर्ण सामना ६-११, ११-७, ११-६, १२-१४, ११-९ ने जिंकला. या सामन्याच्या निर्णायक गेममध्ये घोषालने आघाडी कायम ठेवताना १५ मिनिटांत हा गेम ११-९ ने जिंकला.

दीपिकाला निकोलने हरवले
तत्पूर्वी, भारतीय महिला संघाचा सुवर्णपदकाच्या सामन्यात मलेशियाकडून २-० ने पराभव झाला. अनाका अलंकामोनीला अर्नोल्ड डेलियाने ४३ मिनिटे चाललेल्या सामन्यात ११-९, १२-१०, ११-२ ने हरवले. यानंतर मलेशियाने १-० ने आघाडी घेतली. पुढचा सामना भारताची
दिग्गज खेळाडू दीपिका पल्लिकलचा जगातील नंबर वन डेव्हिड निकोलसोबत होता. निकोलने दीपिकाला २९ मिनिटांत ११-७, ११-६, ११-३ ने पराभूत करून मलेशियाला सुवर्ण मिळवून दिले.