आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेव्हिस चषक : भारताकडून इंडोनेशियाला व्हाइटवॉश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- भारतीय टेनिस संघाने डेव्हिस चषक/आशिया ओसेनिया गु्रप-1 मध्ये पाहुण्या इंडोनेशियाला 5-0 ने व्हाइटवॉश दिला. सोमदेव देववर्मन व युकी भांबरीने सोमवारी पुरुष एकेरीचे सामने जिंकून भारताला एकतर्फी विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने गु्रप-1 मधील स्थान कायम ठेवले. भारताने सलग सेटमध्ये सर्व लढती जिंकल्या.

सोमदेवने डेव्हिड अंगुग सुसांतला 6-3, 6-1 ने धूळ चारली. त्याने 60 मिनिटांत विजय मिळवला. दुसरीकडे युकी भांबरीनेदेखील एकतर्फी विजय नोंदवला. त्याने इंडोनेशियाच्या विस्नू अदी नुग्रोहोवर 6-0, 6-1 ने मात केली. डेव्हिस चषकाच्या इतिहास भारत व इंडोनेशिया टीम आतापर्यंत सहा वेळा समोरासमोर आली. या सर्व लढतीत भारताने विजय मिळवला आहे. यापूर्वी, 1992 मध्येही भारताने इंडानेशियाला 5-0 ने धूळ चारली होती.