आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीची कमाल; अखेरच्‍या षटकात भारताचा विजय, तिरंगी मालिका जिंकली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोहित शर्माचे झुंझार अर्धशतक, कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा जादुई खेळ आणि रवींद्र जडेजाच्‍या अष्‍टपैलू कामगिरीच्‍या जोरावर भारताने केवळ एका विकेटने श्रीलंकेचा पराभव करुन वेस्‍ट इंडिजमध्‍ये आयोजित तिरंगी क्रिकेट मालिका जिंकली. भारताने इंग्‍लंडमध्‍ये झालेल्‍या चॅम्पियन्‍स करंडक स्‍पर्धेचे विजेतेपद पटकाविल्‍यानंतर लागोपाठची मालिका जिंकून धमाल केली. अंतिम सामना अतिशय रोमांचक ठरला. एका क्षणाला सामना श्रीलंकेच्‍या बाजुने फिरला होता. परंतु, कर्णधार महेंद्रसिंह धोनीने तळाच्‍या फलंदाजांच्‍या साथीने भारताचा झुंझार विजय साकारला. रंगना हेराथने 10 षटकांमध्‍ये 20 धावा देऊन 4 बळी घेतले. परंतु, त्‍याची कामगिरी भारताचा विजय रोखू शकली नाही.

अखेरच्‍या षटकात भारताला विजयासाठी 15 धावांची गरज होती. त्‍यावेळी पहिला चेंडू धोनीने गमावला. परंतु, पुढच्‍या तीन चेंडुंवर 2 षटकार आणि 1 चौकार ठोकून भारताचा विजय साकारला. धोनीने 52 चेंडुंमध्‍ये 2 षटकार आणि 5 चौकारांसह 45 धावांची नाबाद खेळी केली. धोनीलाच सामनावीराचा पुरस्‍कार देण्‍यात आला. तर भुवनेश्‍वर कुमार मालिकावीर ठरला.

भारतीय खेळाडुंनी या मालिकेत चॅम्पियन्‍सप्रमाणे कामगिरी केली. पहिले दोन सामने गमाविल्‍यानंतर कमबॅक करत टीम इंडियाने अंतिम फेरीत धडक मारलीच, शिवाय विजेतेपदही पटकाविले. खरी कमाल धोनीने केली. त्‍याने 2011मध्‍ये विश्‍वचषक स्‍पर्धेच्‍या अंतिम सामन्‍यात श्रीलंकेविरुद्धच षटकार ठोकून भारताच्‍या विजयावर शिक्‍कामोर्तब केले होते. आता तिरंगी मालिकेतही त्‍याने तशीच कामगिरी केली. यावेळेस परिस्थिती वेगळी होती. सामना श्रीलंकेच्‍या बाजुने पूर्णपणे झुकला होता. परंतु, अखेरच्‍या षटकात धोनीने सामन्‍याला कलाटणी दिली. भारताचे 9 फलंदाज बाद झाले होते. परंतु, इशांत शर्माच्‍या साथीने त्‍याने भारताला विजेतेपद मिळवून दिले.

पुढील स्‍लाईड्सवर क्लिक करा आणि वाचा अखेरच्‍या षटकापर्यंत रंगलेला थरार...