आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Won Against Pakistan In Hockey, People Reaction On Social Site

भारताला दोन मिनिटात दोन सुवर्ण... सोशल साइटवर शुभेच्‍छांचा वर्षाव!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉकी आणि अॅथलेटिक्‍समध्‍ये भारतीय खेळाडूंनी आज धमाकेदार प्रदर्शन करत दोन सुवर्णपदकांना गवसणी घातली आहे. भारताने 34 वर्षांनंतर आशियाई स्‍पर्धेत पाकिस्‍तानला धूळ चारली आहे. सामना शुटआउटमध्‍ये पोहोचल्‍यानंतर भारताने 4-2 अशी बाजी मारली. आणि सोशल साइटवर शुभेच्‍छांचा वर्षाव सुरु झाला.
रिलेमध्‍येही मिळाले सुवर्ण
हॉकीमध्‍ये सुवर्ण का‍मगिरी करण्‍याच्‍या काही अवधीपूर्वीच भारताच्‍या 4x100 मीटर रिलेमध्ये भारतीय महिला संघाने सुवर्ण पदक मिळविले. प्रियंका पवार, टिंटू लूका, मंदीप कौर आणि एमपी राजू यांनी 3 मिनिट 28.68 सेकंदमध्‍ये शर्यत पूर्ण करत जपान आणि चीनला मात दिली. जपानला रौप्‍य तर चीनला कांस्‍य पदकावर समाधान मानावे लागले.
ओमर अब्‍दुलाने दिल्‍या सर्वप्रथम शुभेच्‍छा
0mar Abdullah- 2 golds in 2 minutes for India. By this rate we can leave behind Bappi Lahiri. #INDvsPAK #400mRelay
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला ने भारतीय संघाला शुभेच्‍छा देताना टि्वटर म्‍हटले की, दोन मिनिटात दोन सुवर्ण अशा गतीने आपण जिंकत राहिलो तर बप्‍पी लहरीला सुध्‍दा लवकरच हरवू शकतो.
अशाप्रकारे आहेत ट्वीट
> Ⓜirchèézz™ ‏@Mircheezz - #INDvsPAK आज गल्ली पासून दिल्‍ली संपूर्ण देश नाचत आहे. दिल्ली.... 1982 च्‍या आठवणींना कायमचा पुर्ण विराम मिळाला आहे!!! भारताचे रियो ऑलिंम्पिकचे तिकिट पक्‍के झाले आहे. #INDvsPAK
> Shreenivas ‏@Shreeniivas - स्वछता अभियानामध्‍ये आज भारताने पाकिस्‍तानला हॉकीमध्‍ये साफ केले. #INDvsPAK
पुढील स्‍लाइडवर पाहा, भारतीय खेळाडूंवर कसा होत आहे शुभेच्‍छांचा वर्षाव...