आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरियाला शूटआऊट; भारताला कांस्यपदक, सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इपोह (मलेशिया) - गत चॅम्पियन भारताने अझलन शाह हॉकी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. भारताने पेनल्टी शूटआऊटवर दक्षिण कोरियाला ४-१ ने पराभूत करून पदक आपल्या नावे केले. दोन्ही संघ निर्धारित ६० मिनिटांपर्यंत २-२ ने बरोबरीत होते. मागच्या वर्षी हे दोन्ही संघ फायनलमध्ये होते. त्या वेळी भारताने सुवर्णपदक जिंकले होते. भारत व कोरिया या दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला.
फोटो - शूटआऊटमध्ये कर्णधार सरदार सिंगने एक गोल केला.

सामन्याचा पहिला गोल भारताने केला. निकिन तिमैयाने ११ व्या मि. गोल करून आपल्या संघाला १-० ने विजय मिळवून दिला. १९ व्या मिनिटाला भारताच्या चुकीचा फायदा उचलत कोरियाच्या हयोसिक यूने गोल केला. स्कोअर १-१ ने बरोबरीत झाल्यानंतर भारताने २२ व्या मिनिटाला सतबीरच्या गोलच्या बळावर २-१ ने आघाडी घेतली. अवघ्या ७ मिनिटांनंतर कोरियाच्या हुनवू नॅमने बरोबरीचा गोल करून स्कोअर २-२ असा केला. अखेर सामना पेनल्टी शूटआऊटवर गेला.

श्रीजेश विजयाचा हीरो
भारतीय विजयाचा हीरो गोलकीपर पी. श्रीजेश राहिला. त्याने पेनल्टी शूटआऊटमध्ये कोरियाचे तीनपैकी २ शॉट रोखून भारताचा रोमांचक विजय मिळवून दिला. भारताकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये आकाशदीपसिंग, सरदारसिंग, रूपिंदरपाल, लाकडा यांनी गोल केले.