आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#CT सराव सामन्यात बांगलादेशाचा लाजीरवाणा पराभव, अशी उडविली खिल्ली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी सुरु असलेल्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशचा 240 धावांनी दारूण पराभव केला. भारताकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागल्यानंतर सोशल मीडियात बांगलादेश टीमची जोरदार खिल्ली उडविली गेली. क्रिकेट फॅन्सने वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत त्यांना क्रिकेट शिकण्याचा सल्ला दिल्ला. एवढेच नव्हे तर, भारताच्या विजयाने खूष झालेल्या फॅन्सनी यानिमित्ताने पाकिस्तानला सुद्धा ट्रोल करण्याची संधी घालवली नाही. असा राहिला मॅचचा रोमांच...
 
- मॅचमध्ये नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकात 7 विकेट गमावत 324 धावा केल्या. भारताकडून दिनेश कार्तिकने 94, हार्दिक पंड्याने नाबाद 80 तर शिखर धवनने 60 धावांचे योगदान दिले. 
- भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची टीम 23.5 षटकात 84 धावांत बाद झाली. बांगलादेशाचे केवळ तीन फलंदाजच दुहेरी धावसंख्या करू शकले.
- ज्यात मेहदी हसन मिराजने सर्वाधिक 24 धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादवने 3-3 विकेट घेतल्या. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे जाणून घ्या, सराव सामन्यात भारताने बांगलादेशाला सहज पाणी पाजल्यानंतर सोशल मिडियात त्यांची कशी उडाली खिल्ली....
बातम्या आणखी आहेत...