आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जणू अश्विनच्या घरातून \'कोहिनूर\' चोरला होता, विजयानंतर आल्या FUNNY कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- भारताने मुंबई कसोटीत इंग्लंडवर एक डाव आणि 36 धावांनी विजय मिळवला. या विजयासोबत भारताने केवळ इंग्लंडविरूद्धची कसोटी मालिका 8 वर्षानंतर नुसती जिंकलीच नाही तर कसोटीतील सलग पाचवी मालिका सुद्धा जिंकली. या मॅचमध्ये विराट कोहली आणि आर. अश्विन यांना भारताला विजय मिळवून दिला. भारतीय संघ जिंकताच सोशल मीडियात विराट आणि अश्विन चमकले. क्रिकेट फॅन्सने या दोन्ही खेळाडूंसह संपूर्ण संघाची जोरदार स्तुती केली. आल्या अशा मजेशीर कमेंट्स...
- टीम इंडियाच्या एका फॅनने कमेंट केली की, 'अश्विन तर इंग्लंड टीमचा असा बदला घेत आहे जसे इंग्रजांनी त्याच्या घरातूनच कोहिनूर हिरा चोरून नेला होता.'
- एक कमेंट अशी आली की, 'काडीपेटी तर तशीही बदनामच आहे, खरी आग तर कोहली आणि अश्विनने लावली.'
- एक फॅनने कमेंट केले की, 'टीम इंडियाला रजनीकांतला बर्थडे विश करण्यासाठी तत्काळ चेन्नईला जायचे होते त्यामुळे मॅच लवकर संपवली.' आपल्याला माहित असेलच की, आज सुपरस्टार रजनीकांत यांचा बर्थडे आहे.
- शुभम नावाच्या फॅनने लिहले की, 'इंग्लंडने म्हटले होते की, आम्ही ही मॅच ड्रॉ साठी खेळणार नाही, आता समजले याचा खरा अर्थ काय होता तो.'
पुढे स्लाईड्सद्वारे वाचा, टीम इंडियाच्या विजयानंतर आलेल्या फनी कमेंट्स....
बातम्या आणखी आहेत...