आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनला नमवत भारतीय महिला तिरंदाजांनी साधला सुवर्णवेध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - तिरंदाजीच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताने चीनला नमवत सुवर्णपदक पटकावले आहे. कोलंबिया येथील मेडेलिन येथे ही स्पर्धा सुरु आहे.

भारतीय महिला संघाने रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय संघाचे नेतृत्व दीपिका कुमारी हिने केले आहे. या संघात रिमील बरील्ये, एल. बॉम्बयला देवी यांचा समावेश आहे. चीनच्या अव्वल मानांकित झू जिंग, चेंग मिंग आणि कुई युआनयुआन यांचा 201-186 या फरकाने पराभव केला आहे.

थंडगार बोचर्‍या वार्‍यामध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत लक्ष्य साधणे अत्यंत बिकट असतानाही भारतीय तिरंदाजांनी त्यांची एकाग्रता कायम ठेवत हा विजय मिळविला.