आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India Won Three Bronz In Asian Games, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहाव्या दिवशी भारताला ३ कांस्य, महिलांच्या डबल ट्रॅप नेमबाजीत भारत तिसरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्र (डावीकडून) वर्षा वर्मन, शगुन चौधरी, श्रेयसी सिंग यांनी कांस्यपदक जिंकले)
इंचियोन - भारताने नौकानयनात (रोइंग) शानदार कामगिरी करताना इंचियोन एशियन गेम्समध्ये सहाव्या दिवशी गुरुवारी येथे पुरुष स्कल्स एकेरीत आणि ऐट फायनलमध्ये कांस्यपदके जिंकली. भारताकडून युवा रोव्हर स्वर्ण सिंगने पुरुषांच्या एकेरी स्कल्समध्ये ७ मिनिटे १०.६५ सेकंदांच्या वेळेसह २००० मीटरचे अंतर पार करत कांस्यपदक मिळवले. महिलांच्या नेमबाजीत शगुन चौधरी, श्रेयसी सिंग आणि वर्षा बर्मन यांनी डबल ट्रॅप प्रकारात कांस्यपदक जिंकले.

यजमान दक्षिण कोरियाच्या किम डोंगयोंगने ७.०६.१७ सेकंदांच्या वेळेस रौप्यपदक, तर इराणच्या मोहसेन शाहदिनाघेदेहने ७.०५.६६ सेकंदासह सुवर्णपदक जिंकले.

स्वर्ण सिंगची चांगली सुरुवात
२४ वर्षीय स्वर्ण सिंगने शानदार सुरुवात केली. त्याने सुरुवातीपासून रेसमध्ये आघाडी घेतली होती. स्वर्ण सिंग सुवर्ण कामगिरी करेल, असे वाटत होते. त्या वेळी इराणी खेळाडूच्या तुलनेत ०.७५ सेकंद आणि कोरियाच्या खेळाडूच्या तुलनेत दोन मिनिटे १२ सेकंदाने पुढे होता. मात्र, यानंतर इराणच्या नौकानयनपटूने चपळ कामगिरी करताना अखेरच्या ५०० मीटरमध्ये स्वर्णला मागे टाकले. काही वेळानंतर कोरियाच्या खेळाडूनेही स्वर्ण सिंगला मागे टाकत दुसरे स्थान मिळवले. स्वर्ण सिंग इराणचा मोहसेनच्या तुलनेत ४.९९ सेकंद आणि कोरियन खेळाडूच्या तुलनेत ४.४८ सेकंदांनी मागे पडला. अखेरच्या ५०० मीटरमध्ये मागे पडल्यो त्याचे सुवर्णपदक हुकले.

ऐटमध्ये कांस्य : पुरुषांच्या ऐट फायनल स्पर्धेत भारतीय नौकानयनपटूंनी कांस्यपदक जिंकले. भारताकडून कपिल शर्मा, रंजित सिंग, बजरंगलाल ताखर, रॉबिन उलाहनन, सावन कुमार, मोहंमद अहमद यांच्या संघाने ५ मििनटे ५१.८४ सेकंदांच्या वेळेसह हे पदक जिंकले.

भारतीय संघ चौथ्या स्थानी
मी अखेरपर्यंत खूप प्रयत्न केले. शेवटच्या २०० मी.मध्ये मी जोर लावला. मात्र, यश मिळू शकले नाही. असो. कांस्यवरही मी समाधानी आहे. - स्वर्ण सिंग, नौकानयनपटू.
भारतीय तिरंदाजी संघ फायनलमध्ये
गुरुवारी भारतीय पुरुष कम्पाउंड टीम स्पर्धेच्या दुस-या सेमीफायनलमध्ये िवजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पदकाची आशा पल्लवीत झाली. भारताने इराणला २३१-२२७ अशा फरकाने हरवले. तत्पूर्वी, महिला तिरंदाजी संघाला कम्पाउंड टीम स्पर्धेत चीन तैपेईकडून २२४-२२६ अशा अंतराने पराभवाचा सामना करावा लागला.
स्क्वॅश : भारताची जपान, चीनवर मात
स्क्वॅशमध्ये भारतीय पुरुष संघाने जपानला ३-० ने सहजपणे नमवले, तर महिला संघाने चीनला ३-० अशा फरकाने हरवले. पुरुष गटात सौरभ घोषालने ब गटातल्या रंगतदार लढतीत जपानच्या युता फुकुईला ११-७, ११-६, ११-६ ने, तर हरिंदरपालसिंग संधूने ताकानोरी शिमिजूला ११-३, ११-८, ११-५ ने, तर महेश मांगोनकरने शिनोसुकेला ११-५, ११-४, ११-४ ने हरवले.
सायना, कश्यप विजयी; पी.व्ही.सिंधूचा पराभव
ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन सायना नेहवाल आणि भारताचा युवा बॅडमिंटनपटू पी. कश्यपने १७ व्या आशियाई चॅम्पियनशिपमधील आपली विजयी मोहीम कायम ठेवली. दुसरीकडे जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले.

सायना उपांत्यपूर्व फेरीत : सायना नेहवालने एकेरीच्या लढतीत इराणच्या अघाइहा जिआझा सौरायाचा २१-७, २१-६ असे नमवले.

कश्यप १७ मिनिटांत विजयी : पी. कश्यपने अवघ्या १७ मिनिटांत प्री-क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली. त्याने पुरुष एकेरीच्या राउंड ऑफ ३२ च्या सामन्यात अफगाणिस्तानच्या इक्बाल अमहद शेकिबला धूळ चारली. त्याने २१-६, २१-६ अशा फरकाने विजय संपादन केला.
सिंधूची झुंज अपयशी : जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेल्या सिंधूने महिला एकेरीत इंडोनेशियाच्या एम. बेल्लाट्रिक्सविरुद्ध दिलेली झुंज अपयशी ठरली. बेल्लाट्रिक्सिकडून संधूचा २०-२२, २१-१६, २२-२० असा पराभव झाला.