आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India Won World Carrom Championship News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्‍वचषक कॅरम स्पर्धेत भारताचे जेतेपद कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मालदीव येथील सन आयलँड रिसॉर्टमध्ये १३ ते १७ सप्टेंबरदरम्यान झालेल्या विश्‍वचषक कॅरम स्पर्धेत भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करून सर्वच पदके जिंकून विजेतेपद कायम राखले आहे.

पुरुष एकेरीत भारताच्या के. श्रीनिवासने आपल्या देशाच्या महंमद गुफरान यांचा १३-२५, २५-१८, २५-१८ ने पराभव करून विजेतेपद मिळवले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत भारताच्या व्ही. आकाशने भारताच्याच रिजाय अकबर अलीचा २५-२१, २५-१२, असा पराभव केला. माजी विश्वकप विजेती दोन वेळा विश्‍वविजेती राहिलेल्या भारताच्या रश्मीकुमारीने कविता सोमांचीचा २५-१७, २५-२२ ने पराभव करून विश्‍वविजेतेपदावर कब्जा केला. भारताच्या काजलकुमारी व पी. जयश्रीने ितसरे व चौथे स्थान अनुक्रमे मिळवले. याआधी पुरुष व महिला दुहेरीमध्ये ही भारतीय खेळाडूंनी सुवर्ण, रौप्यपदके जिंकली.