आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत अ संघाचा मालिका विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डार्विन - भारत अ संघाने ऑस्ट्रेलिया अ संघावर चार गड्यांनी मात करत मालिका विजय मिळवला. भारताच्या केदार जाधव व मनोज तिवारी तसेच रिषी धवन व अक्षर पटेल यांनी केलेली भागीदारी संघासाठी मोलाची ठरली.

पावणेतीनशे धावांचा पाठलाग करताना भारताचा अर्धा संघ 51 धावांतच माघारी परतला होता. मात्र, त्यानंतर केदार जाधव (73 चेंडूंत 78), मनोज तिवारी (75 चेंडूंत 50) यांची भागीदारी संघाला पावणेदोनशेच्या आसपास घेऊन गेली. त्यानंतर रिषी धवनने केलेल्या 56 धावा आणि अक्षर पटेलच्या 46 धावांमुळे भारताने सामन्यात 49 व्या षटकात विजयी लक्ष्य गाठले.
कॅमेरूनचे शतक व्यर्थ : तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कॅमेरून व्हाइटने 137 धावांची तडाखेबंद खेळी केली. त्याने फिलिप ह्युजेस (51 ) यांनी पहिल्या गड्यासाठी 146 धावांची भागीदारी रचत मोठ्या लक्ष्यासाठीची पायाभरणी केली.