चंदिगड - एकीकडे क्रिकेट चाहते कोलकाता नाइट रायडर्सच्या आयपीएल विजेतेपदाचा जल्लोष करत आहेत, तर दुसरीकडे कोलकाताची स्टार तिरंदाज डोला बॅनर्जीने सोमवारी 34 वा वाढदिवस साजरा केला. या स्टार डोलाच्या विवाहाचे टेंशन तिच्या आईला आले आहे. परंतु डोला सध्या हा विषय टाळत आहे. क्रिकेट असल्याने त्याचा जल्लोष तर होणारच. देशाची शान असलेल्या डोलाने देशाला पहिले सुवर्णपदक जिंकून देत विक्रम केला आहे.
डोला कोलकाताच्या बडानगर येथील एका कॉलनीत राहते. तिला महिला अर्जुन म्हणणे वावगे ठरणार नाही. तिचा लक्ष्यभेद अचूक आहे, तिच्या कामगिरीमुळे अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
आईची समस्या :
34 वर्षे वय झाले असतानाही डोला एकटीच आहे. यामुळे तिच्या कामगिरीवर कोणताही परिणाम होत नाही. तिची आई कल्पना मात्र तिच्या भविष्याविषयी चिंतित आहे.मी डोलाला वैतागले आहे. ती नेहमी घराबाहेर राहत असून कित्येक दिवस ती घरी येत नाही. एक दिवस राहते आणि पुन्हा दौर्यावर निघून जाते. मी फक्त तिचे सामान आल्यावर खोलते आणि जाताना पुन्हा बंद करते. तिने लग्न करावे म्हणून मी नेहमी मागे लागते, परंतु ती हा विषय हसण्यावर टाळून देते, असे नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत डोलाची आई कल्पना यांनी म्हटले.
नवव्या वर्षी हाती घेतले धनुष्य
डोलाचे शालेय शिक्षण बडानगर येथील राजकुमारी मेमोरियल मुलींच्या शाळेत झाले. वयाच्या नवव्या वर्षी तिने धनुष्यबाण हाती घेतला. याचे प्रशिक्षण तिने बडानगर येथील तिरंदाजी क्लबमध्ये घेतले. त्यानंतर तिने झारखंड येथील टाटा तिरंदाजी अकादमीत अनेक दिवस प्रशिक्षण घेतले.
पुढील स्लाइडवर पाहा, छायाचित्रे