आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian australian Match Telecast 15 Mi Late Issue In Australia

क्रिकेट ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी, तिरंगी मालिकेत सामन्याचे थेट प्रक्षेपण १५ सेकंद उशिराने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतात सट्टेबाजी अवैध, बेकायदेशीर आहे. ऑस्ट्रेलियात मात्र अधिकृतपणे उजळ माथ्याने क्रिकेट किंवा अन्य कोणत्याही गोष्टीवर ‘सट्टा’ लावता येतो. असे असतानाही सध्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी एका कारणामुळे वाढली आहे. टेलिव्हिजनवर तिरंगी मालिकेचे थेट प्रक्षेपण करताना १५ सेकंद उशिराने सामना दिसत आहे.
नेमका याच गोष्टीचा लाभ घेण्यासाठी सट्टेबाजांचे फोन घेऊन त्यांना स्टेडियमवरून माहिती देणाऱ्या प्रेक्षकांची संख्या अचानक वाढली. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि त्यांच्या अँटी करप्शन युनिटने या अपप्रवृत्तींवर वचक ठेवण्यासाठी वेळीच पावले उचलली आहेत.

भारतीय उपखंडातील सट्टेबाजांना माहिती पुरविणाऱ्यांना ऑस्ट्रेलियात ‘पिच सायडिंग' असे म्हणतात. अशा प्रेक्षकांना स्टेडियमबाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मैदानावर सीसीटीव्ही
स्टेडियमवर प्रत्येक कोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. युनिटचे अधिकारी दुर्बिणीच्या मदतीने, लॅपटॉप व मोबाइल फोनचा वापर करणाऱ्या प्रेक्षकांवर नजर ठेवून असतात. चौकार, षटकार किंवा विकेट पडल्यानंतर मोबाइलवर बोलणारे प्रेक्षक हे या युनिटच्या अधिकाऱ्यांचे मुख्य लक्ष्य असते. बिग बॅश स्पर्धेदरम्यान एकाला युनिटने असेच हेरले होते.