आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Badmintan League: Tendulkar Buy Mumbai Team ?

इंडियन बॅडमिंटन लीग: तेंडुलकर मुंबईचा संघ घेणार विकत?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सायना नेहवालच्या वरच्या वर्ल्ड रँकिंगनंतर आणि ऑलिम्पिक पदकानंतर भारतीय बॅटमिंटन क्षेत्राला नवी उमेद आणि आशा मिळाली आहे. येत्या 14 ते 31 ऑगस्टदरम्यान आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या धर्तीवर भारतात होणा-या इंडियन बॅडमिंटन लीग स्पर्धेच्या सहा संघांसाठी पुरस्कर्त्यांनी लिलाव न करता स्वत:च फ्रँचायझीच्या मालकांची निवड केली आहे.


मुंबई संघाची मालकी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला मिळण्याची शक्यता आहे. ‘स्पोर्टी सोल्युशन्स’ याच्या या लीगच्या आर्थिक बाजूच्या आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सचिन तेंडुलकरला मुंबई संघ देण्याच्या बाबींची पूर्तता होणा-या मार्गावर असली तरीही स्पोर्टी सोल्युशन्स अधिकृतरीत्या जाहीर करण्यास तयार नाही.
०पुण्याच्या संघाची मालकी स्वीकारण्यास ‘डाबर’ या वैद्यक क्षेत्रातील कंपनीने तयारी दर्शवली आहे.
० लखनऊ संघाचे प्रायोजकत्व सहारा इंडियाने स्वीकारले असून हैदराबाद संघाला पी.व्ही.आर. एन्टरटेनमेंटने पुरस्कृत केले आहे.
०सुदिरमन कप बॅडमिंटन स्पर्धेच्या धर्तीवर या लीगचे सामने होतील.


आयपीएलपेक्षा पूर्णपणे वेगळी संकल्पना
खेळाडूंनाही लिलाव पद्धतीने न घेता भारतीय बॅडमिंटन संघटनेमार्फत प्रत्येक शहरांच्या संघात घेतले जाईल. परदेशी खेळाडूंच्या राष्ट्रीय संघटनांना भारतीय बॅडमिंटन महासंघाने तशी पत्रे पाठवली आहेत. आयपीएलपेक्षा पूर्णपणे वेगळी संकल्पना राबवण्यात येत आहे. त्यायोगे प्रत्येक संघांच्या शहरात सहाही संघांचे एकमेकांविरुद्धचे सामने आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे त्या त्या शहरातील प्रेक्षकांना सर्वच दर्जेदार खेळाडूंचा खेळ पाहता येईल.
* मुंबईतील सामने वरळीच्या एनएससीआय क्रीडा संकुलावर होतील. मुंबईत 19 व 20 ऑगस्ट रोजी सामने होतील.
* पुण्यात (डाबर) फ्रँचायझीचे सामने बालेवाडी संकुलावर घेतले जातील. 21 व 22 ऑगस्ट रोजी हे सामने होतील.
* स्पर्धेचा अंतिम सामना व समारोप सोहळा मुंबईत, एनएससीआय संकुलावर करण्याचा मानस असल्याचे कळते. सोहळा रंगतदार करण्यासाठी आयोजकांनी विशेष मेहनत घेतली आहे.