आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Badminton League : Hyderabad Hotshots Reach In Final

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंडियन बॅडमिंटन लीग: हैदराबाद हॉटशॉट्सची फायनलमध्ये धडक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - सायना नेहवालच्या नेतृत्वाखाली बुधवारी हैदराबाद हॉटशॉट्स संघाने जबरदस्त कामगिरी करताना इंडियन बॅडमिंटन लीगच्या फायनलमध्ये धडक दिली आहे. स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात हैदराबाद हॉटशॉट्सने पुणे पिस्टन्सवर 3-0 ने विजय मिळवत बाजी मारली.


हैदराबादकडून अजय जयरामने पुण्याच्या नेग्यूसनला 21-17, 21-11 ने हरवले. यानंतर दुस-या सामन्यात जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या सायना नेहवालने जागतिक क्रमवारीतील तिस-या क्रमांकाच्या ज्युलियन शेंकला 21-10, 19-21, 11-8 ने पराभूत करून हैदराबादची आघाडी 2-0 अशी केली. नंतर पुरुष दुहेरीत हैदराबादच्या वाह लीम-व्ही शेम यांनी पुण्याच्या फिशर निल्सन-थॉमस सनावे यांना 16-21, 21-14, 11-7 ने पराभूत करीत आपल्या संघाचा 3-0 असा विजय मिळवला.