आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Badminton League Player Auctions On July 19 In Delhi

सायना, कश्यप, पोनप्पा, सिंधू ‘आयकॉन’ खेळाडू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये खेळणार्‍या खेळाडूंसाठीचा लिलाव येत्या 19 जुलै रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. लंडनस्थित ऑक्शनर बॉब हायटन हे या लिलावाच्या बोलींचे संचालन करणार आहेत. फाइन आर्ट ऑक्शनर या कंपनीच्या साहाय्याने बॅडमिंटन खेळाडूंची बोली लागेल आणि लिलाव झाल्याचा हातोडाही पडेल. सुमारे 150 खेळाडूंची नावे लिलावासाठी नोंदवली जातील, असा अंदाज आहे. सहा संघांमध्ये प्रत्येकी 11 याप्रमाणे एकूण 66 खेळाडूंचा लिलाव होईल, अशी अपेक्षा आहे. भारताची सायना नेहवाल, ज्वाला गुट्टा, अश्विनी पोनप्पा, पारुपल्ली कश्यप, पी. व्ही. सिंधू हे सहा संघांचे आयकॉन खेळाडू असतील. सहा परदेशी खेळाडूदेखील आयकॉन खेळाडू असतील.

प्रत्येक फ्रँचायझीला दीड कोटी रुपये खर्चाची र्मयादा घालण्यात आली आहे. संघातील खेळाडूसाठी लागलेल्या सर्वोच्च बोलीसाठीच्या रकमेपेक्षा 10 टक्के अधिक रक्कम आयकॉन असणार्‍या खेळाडूंना देण्यात येईल. एकूण 17 देशांच्या बॅडमिंटन संघटनांनी आपापल्या खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्यासाठी परवानगी दिली आहे. 5 जुलैपर्यंत लिलाव होणार्‍या खेळाडूंची नावे निश्चित होणार आहेत.