आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Badminton League: Shenk Sindhu Fights Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंडियन बॅडमिंटन लीग : शेंक-सिंधू आज समोरासमोर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये अवध वॉरियर्सची पी. व्ही. सिंधू व पुणे पिस्टन्सची ज्युलियन शेंक समोरासमोर असतील. अवध वॉरियर्स व पुणे पिस्टन्स यांच्यात सोमवारी सामना रंगणार आहे. सिंधू, वेंग चोंग, के.श्रीकांतच्या शानदार कामगिरीमुळे अवध वॉरियर्सने शनिवारी मुंबईला हरवून अंतिम चारमधील प्रवेश निश्चित केला. पुणे पिस्टन्स गुण तालिकेत दुस-या स्थानावर आहे. तसेच अवध वॉरियर्सने चौथ्या स्थानावर धडक मारली.


पी.व्ही. सिंधू फॉर्मात
पी.व्ही. सिंधू, के.श्रीकांत आणि गुरुसाईदत्तचा फॉर्मही अवध वॉरियर्ससाठी जमेची बाजू आहे. सिंधूने विजयी मोहीम कायम ठेवून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. तिला सोमवारी पुणे पिस्टन्सच्या ज्युलियन शेंकच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. शेंकला या सामन्यात सिंधूला सलामी सामन्यातील पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. के. श्रीकांतही सुरेख कामगिरी करत आहेत.


अनुप श्रीधरचे पुनरागमन
पुणे पिस्टन्सच्या अनुप श्रीधरने आयबीएलमध्ये दमदार पुनरागन केले. त्याने बंगा बीटसच्या हु युनला पराभूत केले. तसेच अश्विनी पोनप्पा महिला एकेरी व दुहेरीतही चमकदार कामगिरी करत आहे.