आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Badminton League: Today Avadh Hyderabad Final Fighting

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंडियन बॅडमिंटन लीग: अवध-हैदराबादची आज अंतिम लढत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरु - हैदरबाद हॉटशॉट्स व अवध वॉरियर्स यांच्यात शुक्रवारी इंडियन बॅडमिंटन लीगची फायनल रंगणार आहे. गुरुवारी अवध वॉरियर्सने उपांत्य सामन्यात सुनील गावसकरच्या मुंबई मास्टर्सवर 3-2 ने मात केली. दुसरीकडे हैदराबाद हॉटशॉट्सने सेमीफायनलमध्ये पुणे पिस्टन्सचा पराभव केला.

सिंधू करणार पराभवाची परतफेड
अवध वारियर्सच्या सिंधूला शुक्रवारी फायनलमध्ये हैदराबादच्या सायना नेहवालला पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या सायनाने सलामी सामन्यात सिंधूला पराभूत केले होते. सिंधूने गुरुवारी मुंबई मास्टर्सच्या ऑल इंग्लंड चॅम्पियन टिने ब्राऊनवर 21-16, 21-13 ने मात केली. तत्पूर्वी, पुरुष एकेरीत मुंबई मास्टर्सच्या ली चोंग वेईने अवध वॉरिसर्यच्या आरव्हीएम गुरुसाईदत्तला धुळ चारली. त्याने 21-15, 21-7 अशा फरकाने सामना जिंकला होता. त्यानंतर मार्किस किडो-मॅथ्यूस बोईने पुरुष दुहेरीत मुंबई मास्टर्सच्या प्रणव चोप्रा व सुमीत रेड्डीला 21-15, 21-10 ने पराभूत केले. दरम्यान, ब्लादिमीवर इवानोवने पुरुष एकेरीत अवध वॉरियर्सच्या र्शीकांतला 21-20, 21-19 ने हरवले.


किडो-पेयाचा निर्णायक विजय
मार्किस किडो व पेया या भाऊ-बहिणीने मिर्श दुहेरीचा निर्णायक सामना जिंकून अवध वॉरियर्सचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. या जोडीने व्लादिमीर इवानोव-टिने ब्राऊनला 21-19, 21-15 ने हरवले.