आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Indian Badminton Team Out Of Sudirman Cup Despite Saina Nehwal\'s Heroics

सुदिरमन चषक बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालची विजयी झुंज व्यर्थ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोंग्गून (चीन)- जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेली सायना नेहवालने दिलेली विजयी झुंज व्यर्थ ठरली. युवा खेळाडूंच्या निराशाजनक खेळीमुळे भारतीय संघाचे सुदिरमन चषक बॅडमिंटन स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. तीन वेळच्या विजेत्या काेरियाने ड गटामध्ये भारताचा ४-१ ने पराभव केला. यासह काेरियाने अापला दबदबा कायम ठेवला. पराभवासह भारताच्या टीमला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.

कश्यप,ज्वालाकडून निराशा
युवा खेळाडू कश्यपला पुरुष एकेरीत साेन वा हाे याने १३-२१, २१-१४, २१-१३ ने हरवले. चांग यि ना व जुंुग कयुंगने ज्वाला-अश्विनीवर १८-२१, २१-१२, २१-१२ ने मात केली. मनू व सिक्की रेड्डीला मिश्र दुहेरीत किम ना हाे-संुग ह्युनने २१-१२, २२-२० ने पराभूत केले. पुरुष दुहेरीत प्रणव-अक्षय देवालकरचा पराभव झाला. या जाेडीला किम जी युंग-किम सा रंगने २१-१०, २१-१९ ने धूळ चारली.

सायनाचा राेमहर्षक विजय
लंडन अाॅलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने काेरियाविरुद्ध राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासह तिने भारताला दमदार सुरुवात करून दिली. सायनाने काेरियाच्या बाई येवाेन जुचा पराभव केला. तिने २२-२०, १७-२१, २१-१३ अशा फरकाने सामना जिंकला. यासाठी तिला सरळ तीन गेमपर्यंत झंुज द्यावी लागली.
बातम्या आणखी आहेत...