आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंडियन बॅडमिंटन लीग आजपासून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बुधवारपासून इंडियन बॅडमिंटन लीगला (आयबीएल) सुरुवात होताच भारतीय क्रीडा जगतात एका नव्या अध्यायाला सुरुवात होईल. आयपीएलच्या धर्तीवर ही बॅडमिंटन लीग होणार आहे. यात सहा संघ एकमेकांशी झुंज देतील. पहिल्या दिवशी दिल्ली स्मॅशर्स आणि पुणे पिस्टन्स यांच्यात सामना होईल. जगात सर्वाधिक बक्षीस रक्कम असलेली ही बॅडमिंटन लीग ठरणार आहे. या स्पध्रेत 10 लाख डॉलर (जवळपास 6 कोटी रुपये) इतकी बक्षीस रक्कम दिली जाईल.

भारतीय बॅडमिंटन महासंघाची (बाई) ही स्पर्धा सहा शहरांत खेळवली जाईल. स्पध्रेतील सहा संघ कृष दिल्ली स्मॅशर्स, अवध वॉरियर्स, मुंबई मास्टर्स, बंगा बीट्स, पुणे पिस्टन्स, हैदराबाद हॉट शॉट्स असे असतील. स्पध्रेचे उद्घाटन सीरी फोर्टचे डीडीए बॅडमिंटन आणि स्क्व्ॉश स्टेडियमवर होईल. स्पध्रेचे फायनल 31 ऑगस्ट रोजी पार पडेल.

गावसकरच्या संघाकडून ली चोंग
स्पध्रेत एकूण 66 खेळाडू झुंज देतील. यात भारतीय खेळाडू सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू, पी. कश्यप, अश्विनी पोनप्पा यांचा समावेश आहे. विदेशी खेळाडूंत जगातला नंबर वन खेळाडू ली चोंग वेई सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल. मलेशियाचा ली लीगमध्ये माजी क्रिकेट कर्णधार सुनील गावसकर यांच्या मुंबई संघाकडून खेळेल.

सिंधू वि. सायना मोठा सामना
15 ऑगस्ट रोजी सायना नेहवाल वि. पी.व्ही. सिंधू समोरासमोर असतील. हा फायनलचा सामना नसला तरीही हा स्पध्रेतील सर्वाधिक आकर्षणाचा सामना असेल. सायना हैदराबाद तर सिंधू लखनऊ संघासाठी खेळेल. मी या सामन्याकडे एका सामान्य सामन्यासारखीच बघत आहे, असे सायनाने सांगितले. सिंधूसोबत हा माझा पहिला आणि अखेरचा सामना असेल. आम्ही दोघी एकमेकींविरुद्ध नेहमीच खेळत आलो आहोत, असेही ती म्हणाली.

लीगचे वेगळेपण
- या काळात जागतिक बॅडमिंटन संघटनेकडून अन्य कोणत्याही लीगला भारतात परवानगी नाही.
- पहिल्या आवृत्तीबाबत सर्वत्र कुतूहल असून उद्घाटन सोहळ्यापासून प्रत्यक्ष सामन्यादरम्यानच्या काही गोष्टी संयोजक स्पोर्टी सोल्युशनने गुलदस्त्यात ठेवल्या आहेत.
- बॅडमिंटनसाठी प्रेक्षक क्षमता मोठी असलेली स्टेडियम्स नाहीत. त्यामुळे ‘गेट मनी’ हा या लीगचा स्ट्राँग पॉइंट नाही. 1200 व 800 रुपयांची तिकिटे विक्रीसाठी आहेत.
- सहाही संघांतील खेळाडूंचे सामने होतील. प्रत्येक सामना ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ असल्यामुळे 5-5 लढती पाहायला मिळतील.

आजचे संघ
दिल्ली स्मॅशर्स : ज्वाला गुट्टा, व्ही. दिजू, डॅरेन ल्यू, निचान जिंदापोन, अरुंधती पानतावणे, साई प्रणीत, एच.एस.प्रणय, बून होएंग टॅन, किएन किट कू, प्राजक्ता सावंत.

पुणे पिस्टन्स : अश्विनी पोनप्पा, ज्युलियन शँक एनगुएन टिन मिन्ह, सौरभ वर्मा, अनूप र्शीधर, जोकिम फिशर निल्सन, वी. कियोंग, रूपेशकुमार, सनावे थॉमस, अरुण विष्णू.


इंडियन बॅडमिंटन लीगचे वेळापत्रक
तारीख ठिकाण वेळ सामना

14 ऑगस्ट दिल्ली रात्री 8 वा. क्रिश दिल्ली स्मॅशर्स विरुद्ध पुणे पिस्टन्स
15 ऑगस्ट दिल्ली दुपारी 4 वा. हैदराबाद हॉटशॉट्स विरुद्ध अवध वॉरियर्स
15 ऑगस्ट दिल्ली रात्री 8 वा. बांगा बीट्स विरूद्ध मुंबई मास्टर्स
17 ऑगस्ट लखनऊ दुपारी 4 वा. क्रिश दिल्ली स्मॅशर्स विरुद्ध हैदराबाद हॉटशॉट्स
17 ऑगस्ट लखनऊ रात्री 8 वा. मुंबई मास्टर्स विरुद्ध पुणे पिस्टन्स
18 ऑगस्ट लखनऊ रात्री 8 वा. बांगा बिट्स विरुद्ध अवध वॉरियर्स
19 ऑगस्ट मुंबई रात्री 8 वा. हैदराबाद हॉटशॉट्स विरुद्ध पुणे पिस्टन्स
20 ऑगस्ट मुंबई रात्री 8 वा. क्रिश दिल्ली स्मॅशर्स विरुद्ध मुंबई मास्टर्स
22 ऑगस्ट पुणे दुपारी 4 वा. हैदराबाद हॉटशॉट्स विरुद्ध मुंबई मास्टर्स
22 ऑगस्ट पुणे रात्री 8 वा. अवध वॉरियर्स विरुद्ध क्रिश दिल्ली स्मॅशर्स
23 ऑगस्ट पुणे रात्री 8 वा. पुणे पिस्टन्स विरुद्ध बांगा बिट्स
24 ऑगस्ट बंगळुरू रात्री 8 वा. अवध वॉरियर्स विरुद्ध मुंबई मास्टर्स
25 ऑगस्ट बंगळुरू रात्री 8 वा. बांगा बिट्स विरुद्ध क्रिश दिल्ली स्मॅशर्स
26 ऑगस्ट हैदराबाद रात्री 8 वा. अवध वॉरियर्स विरुद्ध पुणे पिस्टन्स
27 ऑगस्ट हैदराबाद रात्री 8 वा. हैदराबाद हॉटशॉट्स विरुद्ध बांगा बीट्स
28 ऑगस्ट हैदराबाद रात्री 8 वा. उपांत्य फेरीचा पहिला सामना
29 ऑगस्ट बंगळुरू रात्री 8 वा. उपांत्य फेरीचा दुसरा सामना
30 ऑगस्ट मुंबई रात्री 8 वा. फायनल