आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘इंडियन बॅडमिंटन लीग'चा महाराष्ट्राला करोडो रुपयांचा फायदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘इंडियन बॅडमिंटन लीग’ला (आयबीएल) उद्यापासून नवी दिल्ली येथे सुरुवात होत असून सलग दोन आठवडे चालणार्‍या या स्पर्धेबाबत जागतिक क्रीडा क्षेत्रात आकर्षण निर्माण झाले आहे. 75 ते 80 देश सदस्य असलेल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन संघटनेच्या या सदस्य देशांपैकी चक्क 45 देशांमध्ये या लीगचे थेट प्रक्षेपण होणार असल्याची माहिती या लीगचे जनक व भारताचे माजी बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली.

ते पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचाच हा प्रकल्प आम्ही ‘स्पोर्टी सोल्युशन’ या संस्थेमार्फत राबवत असून आमची राष्ट्रीय बॅडमिंटन संघटना या प्रकल्पातील तिसरा महत्त्वाचा घटक आहे. या लीगचा महाराष्ट्राच्या बॅडमिंटनला थेट लाभ होणार आहे, कारण स्पोर्टी सोल्युशनने महाराष्ट्र आणि भारतीय बॅडमिंटन संघटनेशी एकूण 10 वर्षांसाठी करार केला आहे. त्यापैकी पहिला टप्पा सात वर्षांचा असेल. महाराष्ट्र बॅडमिंटन संघटना आणि भारतीय संघटनेला या सात वर्षांच्या कालावधीसाठी काही कोटींची रक्कम मिळणार आहे. ती दोन संघटनांमध्ये समसमान प्रमाणात विभागली जाणार आहे. उर्वरित तीन वर्षांसाठीही तेवढीच म्हणजे 7 वर्षांसाठी निश्चित करण्यात आलेली हमीची रक्कम मिळणार आहे.