आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंडियन बॅडमिंटन लीग: सिंधू, कश्यप विजयी; अवध वॉरियर्स उपांत्य फेरीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- अवध वॉरियर्सने इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये सोमवारी पुणे पिस्टन्सवर 3-2 ने मात केली. यासह अवधने उपांत्य फेरी गाठली. सिंधू, कश्यप आणि मार्सिस किडो-मॅथ्युस बोईने अवध वॉरियर्सला सामन्यात एकतर्फी विजय मिळवून दिला.

पुरुष एकेरीत पी.कश्यपने पुणे पिस्टनच्या सौरभ वर्माला पराभूत केले. त्याने सरळ दोन गेममध्ये 21-18, 21-16 ने वर्माविरुद्धचा सामना जिंकला. दुसरीकडे पुरुष दुहेरीत मार्सिस किडो-बोईने पुणेच्या अरुण विष्णू व थॉमस सनावेचा पराभव केला. अवधच्या जोडीने 21-15, 21-16 अशा फरकाने दुहेरीचा सामना जिंकला.

सिंधूची शेंकवर मात
जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेती पी.व्ही. सिंधूने सोमवारी आयबीएलमध्ये ज्युलियन शेंकला धूळ चारली. तिने जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानी असलेल्या शेंकला महिला एकेरीत 21-20, 21-20 अशा फरकाने पराभूत केले. ही लढत अधिकच रोमांचक ठरली. मात्र, सिंधूने बाजी मारली.