आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचेन्नई- भारत अध्यक्षीय एकादश आणि ऑस्ट्रेलियन्स यांच्यात दोन दिवसीय सराव सामन्यात जम्मू-काश्मीरच्या परवेझ रसूलने घेतलेल्या 7 बळींच्या जोरावर एकादश संघाने ऑस्ट्रेलियन्स संघाला पहिल्याच दिवशी 241 धावांत गुंडाळले.
ऑस्ट्रेलियन्सकडून सलामीवीर कोवान (58) आणि यूनूस ख्वाजा (32) यांनी 77 धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतर रसूलने धडाधड विकेट काढल्या. वेड (35) आणि स्मिथ (41)यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र रसूलच्या ऑफस्पिनने ऑस्ट्रेलियन्स खेळाडूचे काहीही चालले नाही. लेगस्पिनर सरबजित लढ्ढा याने दोन विकेट घेतल्या. भारतीय एकादशने 88.3 षटकात ऑस्ट्रेलियन्सचा 241 धावांत डाव गुंडाळला. उद्या सकाळी आता भारत एकादश फलंदाजी करेल. हा दोन दिवसीय सामना आङे. त्यानंतर ते 16 ते 18 फेब्रुवारीला भारत अ आणि ऑस्ट्रेलियन्स यांच्यात तीन दिवसीय सराव सामना होईल. 22 फेब्रुवारीपासून भारत आणि ऑस्ट्रोलिया यांच्यात चेन्नईत कसोटी मालिकेतील पहिली कसोटी रंगणार आहे.
अनंतनागचा रहिवाशी असलेला परवेझ जम्मू-काश्मीर रणजी टीमचा सदस्य आहे. त्यालाही जम्मू-काश्मीरचा असल्याचा फटका बसला आहे. त्याला बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर सापडलेल्या विस्फोटाकाप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. वाचा रसूलबाबतची माहिती....... पुढे क्लिक करा......
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.