आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चंदीगड- सर्व बांधवांना माझा नमस्कार. ऑलिम्पिकमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार पहिली लढत तुर्कमेनिस्तानचा बॉक्सर सिरदार याच्यासमवेत मंगळवारी मध्यरात्री 2 वाजता आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छांमुळेच मी या स्पर्धेत विजयी होणार असल्याने तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा, असा संदेश मनोजकुमार या मुष्टियोद्ध्याने फेसबुकवर टाकताच त्याच्या फॅन्सनी त्यावर शेकडो मेसेजची बरसात केली.
केवळ मनोजकुमारच नाही तर नॉकआऊट पंचसह पहिली लढत जिंकणा-या देवेंद्रोसिंहनेदेखील लढत जिंकल्यावर लगेचच दुस-या लढतीचा दिवस आणि वेळ अपडेट केली. त्या क्षणापासून देवेंद्रोसिंहच्या फॅन्सनीदेखील त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. जय भगवान यांनी त्यांची फेसबुक साइट अपडेट करताच त्यांच्याकडेदेखील शेकडो शुभेच्छांचे संदेश जमा झाले.
विजयानंतर पुन्हा धन्यवाद
बहुतांश बॉक्सर्स त्यांच्या प्रारंभीच्या विजयी लढतीनंतर पुन्हा रसिकांना आपल्या विजयाची माहिती देत असून त्यांच्या साहाय्यामुळेच हे शक्य झाले असल्याचे नमूद करीत आहेत. भारतीय क्रीडारसिकांना सर्वच बॉक्सर्सकडून अपेक्षा आहेत. विशेषत: भारताच्या देवेंद्रोसिंहने ज्या आक्रमक आवेशात त्याची पहिली लढत जिंकली, ते पाहता त्याच्याकडूनदेखील किमान एका पदकाची आशा भारतीय क्रीडारसिकांना वाटू लागली आहे.
लंडन ऑलिम्पिकचा ज्वर
लंडन ऑलिम्पिक सुरू होण्याच्या आधीपासूनच स्पोर्ट इंडिया अॅट लंडन यासारख्या वेबसाइट्सवर भारतीय खेळाडूंना पाठिंबा गोळा करण्याचे काम मोठ्या खुबीने केले जात आहे. तुम्ही तुमच्या शुभेच्छा खेळाडूंना द्या आणि त्यांना विजयी करा, असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय पाठीराखेदेखील प्रचंड उत्साहाने या सर्व प्रक्रियेत सहभागी होऊन भारतीय बॉक्सर्सना विजयासाठी शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.