भारताचे तेरा बॉक्सर आशियाई स्पर्धेत गोल्डन पंच मारण्यासाठी सज्ज आहेत. यात १३ पदकांची दावेदारी आहे. गतवर्षी भारताने ९ पदके जिंकली होती. यंदा १० पदकांची आशा आहे. हे भारताचे बॉक्सिंगमधील सर्वश्रेष्ठ प्रदर्शन असेल.
भारतीय बॉक्सरला गतवर्षीची पुनरावृत्ती करायची असेल तर लयीत परतावे लागेल. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत
आपल्याला केवळ पाच पदके चार रौप्य व एक कांस्य मिळाली होती. आशियाई स्पर्धेत स्टार बॉक्सर विजेंद्ररदेखील नसल्याने भारतासाठी आव्हान कठीण असेल.
उझबेक कझाककडून आव्हान
आशियाई स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये उझबेकिस्तान व कझाकिस्तानचे मोठे आव्हान असेल. घरच्या मैदानावर कोरियन बॉक्सरला कमी लेखून चालणार नाही. चीननेदेखील यात प्रगती केली आहे. गतवर्षी त्यांनी सर्वाधिक पाच सुवर्ण जिंकले होते.
पदकाचे दावेदार
मेरी कोम, सरिता देवी, देवेंद्रो लेशराम, शिव थापा, मनदीप जांगडा, विकासकृष्णन यादव, अखिल कुमार
मेरी कोमवर सर्वांची नजर
एम.सी. मेरी कोम गेल्या एशियाडमध्ये कांस्यपदकच जिंकू शकली होती. यंदा तिने पदकाचा रंग बदलण्याचा वशि्वास व्यक्त केला आहे. पाच वेळा वशि्व चॅम्पियन आणि चार वेळा एशियन महिला चॅॅम्पियन बनण्याचा मान यापूर्वीच तिने मिळवला.
१०
पुरुष आणि तीन महिला बॉक्सरचा भारतीय संघात समावेश
५०
पदके भारताने जिंकली आहेत आशियाई स्पर्धेत
िक्रकेटचा समावेश, पण आपली टीम नाही
इंिचयोन स्पर्धेत टी-२० िक्रकेटचासुद्धा समावेश आहे. सहा पदकांसाठी यात झुंज रंगेल. मात्र, यंदाच्या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपला संघ पाठवला नाही. गत स्पर्धेतही भारतीय संघ सहभागी झाला नव्हता.