आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालऊसेन/स्वित्झर्लंड - निलंबित करण्यात आलेल्या भारतीय बॉक्सिंग फेडरेशनच्या कलंकित विद्यमान पदाधिका-यांसमवेत कामकाज करणे शक्य नाही. त्या पदाधिका-यांमुळे खेळाच्या प्रतिमेला आणि प्रतिष्ठेला धक्का लागणार आहे. या पदाधिका-यांसमवेत कोणतेही कामकाज शक्य नसल्याचे कारण देत आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग फेडरेशनने भारतीय बॉक्सिंग फेडरेशनला थेट बडतर्फ करण्याचे पाऊल उचलले आहे.
अत्यंत कठोर शब्दांत भारतीय संघटनेच्या कारभाराचे वाभाडे काढण्यात आले. विविध प्रकारे संपर्क साधला जात असल्याबाबतही फेडरेशनने ताशेरे ओढले आहेत.
अत्यंत खेदजनक निर्णय : मनात अत्यंत खेद असूनही आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग फेडरेशनने भारतीय बॉक्सिंग संघटनेला बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगून संघटनेशी कोणत्याही प्रकारचे अधिकृत संबंध राखले जाणार नसल्याचे म्हटले आहे. भारतातील बॉक्सिंगच्या खेळासह अन्य बाबींचा गांभीर्याने विचार केल्यानंतरही हा निर्णय घेण्यात आला.
नवीन कार्यकारिणीपर्यंत बडतर्फी : भारतीय संघटनेवर नवीन पदाधिका-यांची कार्यकारिणी येईपर्यंत ही कारवाई कायम राहणार असल्याचे एआयबीएचे अध्यक्ष चिंग क्युओ वू यांनी नमूद केले. तसेच या नव्या कार्यकारिणीची छाननी आंतरराष्ट्रीय फेडरेशनकडून करण्यात येणार असल्याचेही चिंग यांनी सांगितले. त्यामुळे अत्यंत पारदर्शकपणे या कार्यकारणीची निवड केली जाण्याची शक्यता आहे. यातून भारतीय संघटनेला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय गमावलेली प्रतिष्टा परत मिळवण्याची संधी निर्माण होईल. त्यासाठी नवी कार्यकारणी सक्रीय असण्याचीही आवश्यकता असेल.
आता पुढे काय ?
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने केलेली बडतर्फी एक प्रकारे भारतीय बॉक्सिंगसाठी काही तरी सकारात्मक बदल घडवणारी ठरू शकेल. अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. कारण आता विद्यमान कार्यकारिणी मंडळाला निवडणूक घेऊन नवीन कार्यकारिणीला आणण्याशिवाय गत्यंतर उरलेले नाही. त्यामुळे एकप्रकारे अभय चौटाला आणि कंपूला हादरा बसला असून या सर्व घटनांमधून काही चांगले निष्पन्न होण्याची शक्यता आहे. नवीन सदस्य संघटनेची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतील.
एकतर्फी बडतर्फी अयोग्य : मतोरिया
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग फेडरेशनने केलेली एकतर्फी बडतर्फी अयोग्य असल्याचे भारतीय संघटनेचे अध्यक्ष अभिषेक मतोरिया यांनी म्हटले आहे. तसेच आता या निर्णयाविरोधात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनकडे दाद मागण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, याबाबत एआयबीए कोणता निर्णय घेणार यावर सर्वांची नजर असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.