आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय बॉक्सिंगपटूंना ‘साई’चे भक्कम संरक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भारतीय बॉक्सिंग फेडरेशनला आंतरराष्‍ट्रीय बॉक्सिंग संघटनेने निलंबित केले असले तरीही एकाही भारतीय बॉक्सिंगपटूचे नुकसान होणार नाही, याची काळजी भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) घेतली असल्याची माहिती ‘दिव्य मराठी’शी बोलताना औरंगाबादेतील साई केंद्राचे सहायक संचालक वीरेंद्र भंडारकर यांनी दिली.

भारतीय बॉक्सिंगपटूंना संरक्षण देण्यासाठी साईने रॅकी डॉयज यांच्या मार्गदर्शनाखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये त्यांच्याशिवाय कॅप्टन वेणू गोपाल, प्रशिक्षक डिगो सिंग, भारतीय वरिष्ठ संघाने मुख्य प्रशिक्षक जी. एस. संधू आणि भारतीय कनिष्ठ संघाने मुख्य प्रशिक्षक जी. मनोहर यांचा समावेश आहे. भारतीय बॉक्सिंग फेडरेशन निलंबित झाल्याने खेळाडूंचे कोणतेही नुकसान होणार नाही, यासाठी ही समिती कार्यरत आहे. सर्व वयोगटातील खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर, राष्‍ट्रीय, आंतरराष्‍ट्रीय स्पर्धांचे नियोजन, विविध वयोगटातील संघ निवड, स्पर्धेला जाण्या-येण्याची जबाबदारी आदी सर्व कामे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून मान्यतेने आणि सहकार्याने ही समिती करते.

सत्तेच्या राजकारणामुळे भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचे निलंबन झाले. यामुळे देशभरातील खेळाडूंचे नुकसान होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, साईने पुढाकार घेऊन खेळाडूंना अडचणीतून बाहेर काढले. निलंबन झाले तेव्हापासून सर्व बॉक्सिंगपटूंची जबाबदारी साईने स्वीकारली आहे. या अंतर्गंत आतापर्यंत औरंगाबादेत राष्‍ट्रीय स्तरावरील बॉक्सिंगची दोन शिबिरे झाली आहेत, असेही भंडारकर यांनी सांगितले.

असे करणार संचलन :
बॉक्सिंग फेडरेशन निलंबित होण्यापूर्वी युवा गटाचा वार्षिक कार्यक्रम तयार करण्यात आला होता. आता या कार्यक्रमावर साईकडून मदत केली जात आहे.


संघ निवडही साई करणार
विविध स्पर्धांसाठी भारतीय संघाची निवड साईची समिती करणार आहे. राष्‍ट्रीय प्रशिक्षण शिबिरातून हा संघ निवडला जाणार आहे. विविध राष्‍ट्रीय, आंतरराष्‍ट्रीय स्पर्धेत साईने निवडलेला भारताचा संघ प्रतिनिधित्व करेल, असेही यावेळी भंडारकर यांनी नमूद केले.