आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Colts In Strong Position After Vijay Zol Scored 173

झोलच्या जबरदस्त फलंदाजीने युवा संघाचा श्रीलंकेविरुद्ध धावांचा डोंगर !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दांबुला - भारत, श्रीलंका यांच्यातील 19 वर्षांखालील खेळल्या जात असलेल्या युवा क्रिकेट कसोटीत भारतीय संघाने कर्णधार विजय झोलच्या (173) दीड शतकी खेळीच्या बळावर 7 बाद 503 धावांवर डाव घोषित केला. प्रत्युत्तरात दुसर्‍या दिवसअखेर श्रीलंकेने 1 बाद 24 धावा केल्या.

भारतीय संघाच्या आघाडीचे सर्व पाच फलंदाज धावा काढण्यात यशस्वी ठरले. यामध्ये कर्णधार विजय झोलने कालच्या नाबाद 129 धावांच्या पुढे खेळताना 44 धावा जोडल्या. त्याने 270 चेंडंूचा सामना करताना 173 धावा काढल्या. या खेळीत त्याने 21 चौकार आणि 2 षटकार लगावले. कारूनारातने त्याला के. मेडिंसच्या हाती झेलबाद केले. संजू सॅमसन 89 धावा काढून बाद झाला. त्याला शतक पूर्ण करता आले नाही. त्यानंतर आलेल्या एस. एस. अय्यरने अर्धशतक ठोकले. त्याने 74 चेंडंूत 10 चौकारांच्या मदतीने 65 धावांची खेळी केली. मोहम्मद सैफ (17), गाणी (2) स्वस्तात बाद झाले. मोहम्मद सैफने नाबाद 17 आणि कुलदीप यादवने नाबाद 2 धावा काढल्या. श्रीलंकेच्या कारूनारातने 22 षटकांत 94 धावा देत सर्वाधिक 4 गडी बाद केले.
प्रत्युत्तरात दुसर्‍या दिवसअखेर श्रीलंकेने 1 बाद 24 धावा काढल्या. संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर के. मेडिंस 6 धावांवर तंबूत परतला. भारताच्या अतुल सिंगने त्याला पायचित करून चांगली सुरुवात केली. दुमीनडू नाबाद 10 आणि के. कुलशेखरा नाबाद 5 धावांवर खेळत आहेत. अतुल सिंगने 6 षटकांत 10 धावा देत 1 गडी टिपला. त्याने 2 षटके निर्धाव टाकले.

विजयने कामगिरीत सातत्य राखले

श्रीलंकेविरुद्ध शानदार दीड शतक ठोकल्याने आनंदी आहे. त्याने कामगिरीत सातत्य राखले आहे. बाहेरील सर्व खेळपट्ट्यांचा त्याने अभ्यास केला आहे. त्यामुळे तो यशस्वी ठरत असून, चालु चॅम्पियनशिपही जिंकेल.
राजू काणे, विजय झोलचे प्रशिक्षक.


संक्षिप्त धावफलक
भारत : 7 बाद 503 धावा (डाव घोषित). विजय झोल (173), संजू सॅमसन (89), ए. हेरवाडकर (71), कारूनारातने (94/4). श्रीलंका 1 बाद 24 धावा. डुमिंडू (10 नाबाद), कुलशेखरा (5 नाबाद), अतुल सिंग (10/1).