आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indian Cricket Fans Trolls Shoaib Malik On His Statement On Favorite Indian Bowler

शमीचे कौतूक करताना हे काय बोलला शोएब मलिक, भडकले इंडियन फॅन्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- भारतीय टेनिसपट्टू सानिया मिर्झाची पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक नुकताच आपला फेवरेट इंडियन बॉलर कोण हे सांगत वादात अडकला. खरं तर ICC ने आपल्या ट्विटर अकाउंटवर शनिवारी एक व्हिडिओ शेयर केला. ज्यात, मलिकने टीम इंडियाचा मोहम्मद शमीला आपला फेवरेट बॉलर असल्याचे म्हटले. तो म्हणाला की, 'शमी माझा आवडता बॉलर आहे. मी त्याचे नाव तो मुस्लिम आहे म्हणून घेत नाही. मी त्याच्याविरोधात खेळलो आहे व त्याला करताना पाहिलेही आहे.' शोएब मलिकने शमीच्या धर्माचा उल्लेख केला ज्यामुळे भारतीय फॅन्स मलिकवर भडकले. बहुतेक फॅन्सने त्याला क्रिकेट आणि धर्माला वेगवेगळे ठेवण्याचा सल्ला दिला. फॅन्सने त्याला सुनावले की, भारतात लोक खेळाडूचा धर्म पाहून त्याला पसंत करत नाहीत. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, शोएब मलिकवर भारतीय  इंडियन फॅन्सनी कसा काढला राग...
बातम्या आणखी आहेत...