आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Cricket Issue MS Dhoni Include In Riti Sporting Company Issue

धोनीचाही जोडधंदा; ‘रीती’मध्ये 15 टक्के शेअर्सची भागीदारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- क्रिकेटच्या कुप्रसिद्धीचे ढग आणखी काळेकुट्ट होत चालले आहेत. या खेळखंडोब्यातील ताज्या प्रकरणाचा खिलाडी आहे खुद्द कर्णधार महेंद्रसिंग धोनी. खेळाच्या मैदानासोबत व्यवसायाच्या रणातही धोनीचे हात गुंतलेले असल्याचे प्रकरण समोर आले आहे. ‘रीती’ या स्पोर्ट्स मार्केटिंग कंपनीमध्ये धोनीने 15 टक्के भागीदारी घेतल्याचे वृत्त आहे. यामुळे त्याच्या क्रीडा आणि व्यावसायिक हितसंबंधांत विरोधाभासाची स्थिती निर्माण झाली आहे. ही कंपनी त्याचा मित्र अरुण पांडेय याची आहे.

या पर्दाफाशानंतर 22 मार्चला धोनीला शेअर्स दिले होते, अशी कबुली ‘रीती’ने दिली आहे. मात्र लगेचच 26 एप्रिल रोजी ते परतही घेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले. दरम्यान, या मुद्द्यावर धोनीकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त झालेली नाही.

मयप्पन, विंदू न्यायालयीन कोठडीत :
बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन आणि अभिनेता विंदू दारासिंग यांना सोमवारी 14 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

शेअर्स खरेदीत काय चुकीचे
1. कर्णधार धोनी आणि व्यावसायिक धोनी यांच्या हितसंबंधांत विरोधाभासाची स्थिती निर्माण होऊ शकते. रीती ही धोनीचीही मॅनेजर कंपनी आहे. मात्र कंपनीतील मालकीमुळे 2 प्रकरणांत विरोधाभासी हितसंबंध उद्भवतो.
पहिले : धोनी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत कर्णधार आहे. त्याची कंपनी सुरेश रैना, रवींद्र जडेजा, प्रग्यान ओझा आणि आरपी सिंह यांचेही मॅनेजमेंट करते. त्यांना मिळणार्‍या कमाईचा 15 टक्के वाटा धोनीच्या खिशात जातो. संघनिवडीसाठी धोनीचा सल्ला घेतला जातो. यात वारंवार या चौघांची नावे असतात.
दुसरा : धोनी आयपीएल संघ चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार आहे. इंडिया सिमेंट्स कंपनीकडे त्याची मालकी आहे. याच कंपनीत धोनी उपाध्यक्षही आहे. या कंपनीचेही मॅनेजमेंट रीतीकडेच आहे. चेन्नई संघात रैना व जडेजाचाही समावेश आहे. यावर धोनी गप्प आहे. येथेही हितात विरोधाभास दिसतो.
2. श्रीनिवासन हे इंडिया सिमेंटचे मालक आहेत. धोनी 2011-12 मध्ये आठ कसोटी सामने हरला तेव्हा त्याच्या हकालपट्टीची मागणी झाली होती. मात्र श्रीनिवासन यांनी नकाराधिकार वापरून ती फेटाळली होती.

210 कोटी रुपयांचा करार
रीती स्पोर्ट्सने 2010 मध्ये धोनीसोबत 210 कोटी रुपयांचा करार केला होता. यानुसार धोनीला दरवर्षी कंपनीकडून 70 कोटी मिळणार आहेत.