आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Cricket News In Marathi, Gym, Divya Marathi

जिम टाळून खेळाडूंचे सौभाग्यवतींसोबत पर्यटन !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इंग्लंड दौ-यात भारताच्या मानहानिकारक कसोटी पराभवानंतर बीसीसीआय कडक पावले उचलण्याच्या बेतात आहे. एका अधिका-याचे वक्तव्य त्यासाठी पुरेसे बोलके ठरते. आम्हाला जितकी माहिती मिळाली आहे, त्यानुसार खेळाडूंना क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचे होते. मात्र, त्यांच्या पत्नींचा यात खोडा होता.
नेट्समध्ये सराव, जिममध्ये कसरत करायचा खेळाडूंचा बेतही सौभाग्यवतींच्या हट्टापायी त्यांना अनेकदा रद्द करावा लागला. कारण त्यांना शहरात सैर मारायची होती. त्यामुळे इंग्लंड दौ-यानंतर िक्रकेटपटूंच्या पत्नींचा परदेश दौ-याचा काळ कमी करण्याचा विचार सुरू असल्याचे या वरिष्ठ अिधका-याने माध्यमांशी बोलताना सांगितले.

इंग्लंडविरुद्ध कसोटी मािलकेत १-३ ने हरल्यामुळे भारतीय संघावर टीकेचे आसूड ओढले जात आहेत. हा अिधकारी म्हणाला की, स्लीपमध्ये झेल घेण्याच्या अनेक संधी आपण गमावल्या. दोन अग्रणी फलंदाजही पुन्हा-पुन्हा एकच चूक करून बाद झाले. खेळाडूंच्या या लाजिरवाण्या कामगिरीमागे त्यांच्या पत्नी आणि प्रेयसीचाही ‘वाटा’ असल्याचे मानले जात आहे. माध्यमांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय िक्रकेट नियामक मंडळ आता खेळाडूंच्या पत्नी कोणत्या दौ-यावर, िकती काळ सोबत असतील याचा निर्णय करणार आहे.

यांचा गोतावळा
इंग्लंड दौ-यात बीसीसीआयने चेतेश्वर पुजारा, मुरली वजिय, आर.अशि्वन, स्टुअर्ट िबन्नी आणि गौतम गंभीरला पत्नीला सोबत घेण्याची परवानगी दिली होती. त्याशिवाय विराट कोहलीने प्रेयसी अनुष्का शर्मालाही सोबत नेले होते.

पत्नींचा मुक्काम निश्चित करणार
भारतीय िक्रकेट नियामक मंडळाच्या अिधका-यानुसार भारतीय िक्रकेट नियामक मंडळ आता िक्रकेट ऑस्ट्रेिलया तसेच इंग्लंड आणि वेल्स िक्रकेट बोर्डाची पद्धत अवलंबण्याच्या विचारात आहे. ही दोन्ही िक्रकेट मंडळे परदेश दौ-यात खेळाडूंच्या पत्नींचा मुक्काम काळ नशि्चित करतात. याच काळात िक्रकेटपटूंना पत्नींसमवेत राहता येत असल्याचे दिसून येते.