आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाधव, सॅमसनच्या खेळीने भारत अ संघाचा विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डार्विन - आघाडीची फळी कोसळल्यानंतर केदार जाधवने केलेल्या दमदार खेळीमुळे भारत अ संघाला ऑस्ट्रेलिया एनपीएस संघावर तीन गडी राखून मात करता आली. संजू सॅमसनने केलेल्या नाबाद 55 धावांची खेळीदेखील संघाच्या विजयात मोलाचे योगदान देणारी ठरली.
ऑस्ट्रेलिया एनपीएस संघाने भारत अ संघापुढे विजयासाठी 235 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर भारताचा डाव 5 बाद 63 असा संकटात सापडला असताना केदार जाधव आणि संजू सॅमसन यांची भागीदारी संघाला विजयाच्या मार्गावर नेणारी ठरली. 112 धावांच्या भागीदारीत केदारने 53 चेंडूंत 87 धावा फटकावत संघाचा विजय सुकर करून दिला, तर संजू सॅमसनने अर्धशतकी खेळी करत संघाला विजयापर्यंत नेले. केदारने त्याच्या खेळीत 11 चौकारांची बरसात केली, तर लेग स्पिनर जेम्स मुरहेडला पुढे सरसावत चार षटकार मारले. सॅमसनने 80 चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळी करताना सहा चौकार ठोकले. दोघांनी 10 षटकांमध्ये 92 धावा गोळा करत संघाला चाळीस षटकांपूर्वी आणि तीन गडी राखून विजय मिळवून दिला.