आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Cricket Team Captain M S Dhoni News In Marathi

चमक नेतृत्वाची: बुचकाळ्यात टाकणारे धोनीचे निर्णय यशस्वी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- युवा खेळाडूंच्या जिगरबाज कामगिरीच्या बळावर टीम इंडियाने लॉडर््सवर तब्बल 28 वर्षांनी ऐतिहासिक विजय मिळवला असला, तरीही या विजयात कर्णधार धोनीच्या कुशल नेतृत्वाचाही सिंहाचा वाटा आहे. धोनीच्या बुचकाळ्यात पाडणार्‍या निर्णयाने संघाला विजयी मार्गावर आणले.

धोनीच्या नेतृत्वाचे वेगळेपणे असे....
>टीम इंडियात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, जहीर खान, अनिल कुंबळे असे अनुभवी खेळाडू नसताना धोनीने युवा खेळाडू अजिंक्य रहाणे, भुवनेश्वर कुमार, स्टुअर्ट बिन्नी, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, मुरली विजय यांच्यावर विश्वास टाकला. या युवा खेळाडूंना सर्व परिस्थितीत चांगली कामगिरी करण्यास प्रेरित केले. परिणामी खेळाडूंनी निकालाचा दबाव न घेता उत्तम खेळ केला.

>श्रीलंकेच्या संघाने इंग्लंडविरुद्ध ज्या पद्धतीने विजय मिळवला त्याचे अनुकरण धोनीने केले. यात काहीच गैर मानले नाही. श्रीलंकेकडून डावखुरा फिरकीपटू रंगना हेराथने ज्या पद्धतीने इंग्लिश फलंदाजांना वेठीस धरले, त्याच धर्तीवर धोनीने जडेजाचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला. यात त्याला काही अंशी यश मिळाले.

>धोनीने अनपेक्षित असे क्षेत्ररक्षण लावून सर्वांनाच बुचकळ्यात टाकले. समालोचकापासून ते इंग्लिश फलंदाजही विचारात पडले. जडेजा फिरकीपटू असताना त्याच्या गोलंदाजीवर थोडा मागे जाऊन तो उभा राहिला. धोनीला स्लिपचा क्षेत्ररक्षक थोडा वाइड उभा असलेला हवा होता. या वेळी त्याने इतर क्षेत्ररक्षकांना जवळ केले. दुसरीकडे भुवनेश्वर कुमार मध्यमगती गोलंदाज असताना त्याच्या गोलंदाजीवर तो दूर उभा राहण्याऐवजी अगदी यष्टीच्या जवळ उभा झाला. या वेळी स्लिपचे क्षेत्ररक्षक मात्र वेगवान गोलंदाजांसाठी दूर उभे असतात त्याप्रमाणे दूर त्यांच्या जागी उभे होते. फलंदाज बुचकळ्यात पडले. अली, रुटच्या विकेट घेण्यासाठी धोनीने असे चकित केले.
धोनीनेच ईशांत शर्माला बॉडीलाइन आणि आखूड टप्प्याचे चेंडू टाकण्यास सांगितले. याचा फायदा झाला. अनपेक्षितपणे आलेल्या उसळत्या बाउन्सरमुळे मोईन अली अडचणीत सापडला. आता तो बाद झाला. आखूड टप्प्याच्या गोलंदाजीला हवे असलेले क्षेत्ररक्षण धोनीने लावले होते. ईशांतला तशी गोलंदाजी करणे भाग पडले.

>धोनीने या सामन्यात रोहित शर्मा, आर. अश्विन आणि गौतम गंभीर यांच्या जागी अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नी, शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांना संधी दिली. एका अर्थाने हा मोठा जुगार होता. मात्र, यात धोनी यशस्वी ठरला. अजिंक्य रहाणेने मोक्याच्या वेळी शतक ठोकून वेगवान गोलंदाजांना पोषक अशा खेळपट्ट्यांवर आपण उपयोगी असल्याचे सिद्ध केले.

>धोनीने सामन्यादरम्यान कामचलाऊ गोलंदाज मुरली विजयचा उपयोगही केला. नशिबाने साथ दिली आणि मुरली विजयने पहिल्या डावात मोईन अलीची महत्त्वाची विकेट घेतली.

>सततच्या पराभवाने खचून न जाता पुढच्या विजयासाठी त्याने संघातील सर्व खेळाडूंना तयार केले. प्रत्येकाला वैयक्तिकरीत्या सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी त्याने प्रेरित केले. मुरली विजय, रवींद्र जडेजा, ईशांत शर्माची कामगिरी हे त्याचेच फळ आहे. एकवेळ अशी होती की सलगच्या सुमार कामगिरीमुळे ईशांतला संघाबाहेर करण्यात आले होते. मात्र, धोनीने कर्णधार म्हणून त्याची पाठराखण केली. त्याच ईशांतने लॉर्ड्सवर विजय मिळवून दिला.
>माहीने कुकलासुद्धा सल्ला दिला. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध आम्ही 4-0 ने हरलो. पराभवानंतर आपणाला काय करायचे आहे, हे समजणे महत्त्वाचे असते. हे वैयक्तिकसुद्धा अवलंबून असते. जबाबदारी घेऊन दबावात येतो की, त्या परिस्थितीतही नॉर्मल राहतो,’ असे तो म्हणाला.