आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Cricket Team Give Gift To Sachin Retirment

सचिनमय कसोटी भारताच्या नावे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘सचिन, सचिन, सचिन’ अशा गजरात पंढरीत (वानखेडेवर) होत असलेल्या क्रिकेटच्या ‘देवा’चा धावा करणा-या कोट्यवधी चाहत्यांच्या उपस्थितीत धोनी ब्रिगेडने सचिनला मालिका विजयाने निरोप दिला. आपली करिअरमधील 200 वी कसोटी खेळून ‘विक्रमादित्य’ सचिनने शनिवारी तमाम चाहत्यांच्या उपस्थितीत क्रिकेटला अलविदा केले.
कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पाहुण्या वेस्ट इंडीजवर शनिवारी मालिका विजय मिळवून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला निरोप दिली. भारतीय संघाने तिस-याच दिवशी दुसरी कसोटी जिंकली. यजमान टीमने डाव व 126 धावांनी पाहुण्या विंडीजचा पराभव केला. यासह भारतीय संघाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने एकतर्फी विजय मिळवला.
मालिकेत सलग दोन शानदार शतके झळकावणारा रोहित शर्मा मालिकावीर आणि दुस-या कसोटीत एकूण दहा विकेट टिपणारा प्रज्ञान ओझा सामनावीरचा मानकरी ठरला.
सचिन तेंडुलकरच्या (74) अर्धशतकापाठोपाठ रोहित शर्मा (111 नाबाद) आणि चेतेश्वर पुजारा (113) यांच्या शतकांच्या बळावर भारतीय संघाने पहिल्या डावात 485 धावांचा डोंगर रचला होता. प्रत्युत्तरात पाहुण्या विंडीजचा दुसरा डाव 187 धावांत गुंडाळला गेला. प्रज्ञान ओझा (5/49) आणि आर.अश्विन (4/89) यांनी धारदार गोलंदाजी करताना विंडीजची टीम अवघ्या 47 षटकांत पॅव्हेलियनमध्ये परतवली. यासह विंडीजला सलग दुस-या कसोटीतही पराभवाला सामोरे जावे लागले. दिनेश रामदिनने (53) केलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली. मालिकेत विंडीजचा स्फोटक फलंदाज क्रिस गेल सपशेल अपयशी ठरला.
विंडीजने 3 बाद 43 धावांवरून शनिवारी तिस-या दिवशी खेळायला सुरुवात केली. क्रिस गेलने 35 धावांपर्यंत मजल मारून ओझाच्या चेंडूवर धोनीच्या हाती झेल दिला. त्यापाठोपाठ देवनारायण भोपळा न फोडता तंबूत परतला. त्याला ओझाने झेलबाद केले. चंद्रपॉलने 41 धावांचे योगदान दिले. मात्र, त्याला आर.अश्विनने पायचित केले. अखेर, रामदिनने संघाचा डाव सावरला. मात्र, त्याला तळातल्या फलंदाजांची साथ मिळाली नाही. त्याने 68 चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकारासह संघाकडून सर्वाधिक नाबाद 53 धावा काढल्या.
गोलंदाजीत ओझाने 18 षटकांत 49 धावा देऊन पाच विकेट घेतल्या. त्याने गेल, बेस्ट ,सॅम्युअल्स, देवनारायण व सॅमीला बाद केले. त्यापाठोपाठ अश्विननेही कहर केला. त्याने 17 षटकांत 89 धावा देत चार विकेट काढल्या.
प्रज्ञान ओझाचा ‘पंच’ (18-6-49-5)
पहिला बळी 9.4 षटक टिनो बेस्ट
दुसरा बळी 17.3 षटक सॅम्युअल्स
तिसरा बळी 21.3 षटक क्रिस गेल
चौथा बळी 23.4 षटक देवनारायण
पाचवा बळी 39.6 षटक सॅमी
आर.अश्विनचा ‘चौकार’ (17-4-89-4)
पहिला बळी 6.2 षटक पॉवेल
दुसरा बळी 12.2 षटक ब्राव्हो
तिसरा बळी 38.2 षटक चंद्रपॉल
चौथा बळी 44.4 षटक शिलिंगफोर्ड
धावफलक
वेस्ट इंडीज पहिला डाव सर्वबाद 182 धावा
भारत पहिला डाव सर्वबाद 495 धावा
वेस्ट इंडीज दुसरा डाव धावा चेंडू 4 6
क्रिस गेल झे.धोनी गो.ओझा 35 53 4 1
पॉवेल झे.शमी गो.अश्विन 9 16 0 0
बेस्ट पायचीत गो.ओझा 9 17 2 0
ब्राव्हो झे.विजय गो.अश्विन 11 10 2 0
सॅम्युअल्स यष्टी.धोनी गो. ओझा 11 18 2 0
चंद्रपॉल पायचीत अश्विन 41 62 4 0
देवनारायण झे आणि गो ओझा 0 6 0 0
रामदिन नाबाद 53 68 8 1
सॅमी पायचीत ओझा 1 8 0 0
शिलिंगफोर्ड पायचीत ओझा 8 17 2 0
गॅब्रिएल त्रिफळाचीत गो. शमी 0 7 0 0
अवांतर : 9. एकूण : 47 षटकांत सर्वबाद 187 धावा. गडी बाद होण्याचा क्रम : 1-15, 2-28, 3-43, 4-74, 5-87, 6-89, 7-157, 8-162, 9-185, 10-187 गोलंदाजी : भुवनेश्वर 3-0-4-0, मो.शमी 7-0-28-1, अश्विन 17-4-89-4, ओझा 18-6-49-5, तेंडुलकर 2-0-8-0.
सामनावीर : प्रज्ञान ओझा. मालिकावीर : रोहित शर्मा.