आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा इंग्लंड दौरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय संघ तब्बल 1959 नंतर प्रथमच इंग्लंड दौर्‍यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पुढच्या वर्षी 23 जूनपासून सुरू होणार्‍या या दौर्‍यात टीम इंडिया पाच कसोटी, पाच वनडे आणि एक टी-20 सामना खेळून आठ सप्टेंबरला मायदेशी परतणार आहे.

ट्रेंट ब्रिज, लॉर्ड्स, द रोज बाऊल, ओल्ड ट्रेफर्ड आणि ओव्हल येथे पाच कसोटींचे आयोजन करण्यात आल्याची माहिती इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) सोमवारी दिली. याशिवाय भारतीय संघ लिसेस्टरशायर, डर्बिशायर आणि मिडलसेक्सविरुद्ध सामने खेळणार आहे. यापूर्वी भारताने 2011 मध्ये इंग्लंडचा दौरा केला होता.