आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Cricket Team Goes To England For Playing Test Series, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धोनीच्‍या नेतृत्‍वाखाली भारतीय क्रिकेट संघ इंग्‍लड दौ-यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या गत मालिकांमधील अपयशापासून आम्ही बरेच शिकलो आहेत. त्या वेळी केलेल्या चुका करायच्या नाहीत याची मनाशी खूणगाठ बांधून आज आम्ही इंग्लंडच्या पाच कसोटी सामन्यांच्या दौर्‍यावर निघत आहोत, असे मत टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केले आहे.
या दौर्‍यात षटकांचा वेग निर्धारित ठेवण्यासाठी बर्‍याचदा अनिच्छेने फिरकीपटूंची मदत घ्यावी लागू शकते. खेळपट्टी कशीही असली तरीही येथील हवामानानुसार परिस्थिती बदलते. त्यामुळे हवामानाचा अंदाज घेऊन खेळाचे डावपेच आखण्याचे आव्हान असणार असल्याची माहिती महेंद्र सिंग धोनीने या वेळी दिली. प्रशिक्षक डंकन फ्लेचर म्हणाले, ‘इंग्लंडचे काही उत्कृष्ट खेळाडू निवृत्त झाल्यामुळे ते जडणघडणीच्या प्रक्रियेतून जात आहेत. केविन पीटरसनची अनुपस्थिती निर्णायक ठरणार आहे. अनुभवी खेळाडू अँलेस्टर कुक व इयान बेल वगळता इंग्लंडच्या संघातील अन्य सर्व खेळाडू नवीन आहेत. मात्र, अँडरसन व ब्रॉड यांची गोलंदाजी अधिक परिपक्व व अनुभवी आहे.’
पुढील स्‍लाइडवर वाचा, वेळापत्रक..