आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Cricket Team News In Marathi, Divya Marathi, Dankan Fleture, Ravi Shastri

टीम इंडियाला नवा कोच म्हणून भारतीय व्यक्ती मिळणार; कुंबळे, द्रविड शर्यतीत !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्लंड दौ-यावर सपाटून मार खाल्ल्यानंतर टीम इंडियाच्या संचालकपदी रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती तात्पुरती असल्याचे मानले जात आहे. इंग्लंडविरुद्ध वनडे मािलकेनंतर प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांना नारळ िमळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. फ्लेचर यांच्या जागी भारताच्या माजी खेळाडूला प्रशिक्षकपदाची जबाबदारी िमळण्याची शक्यता आहे.

हे पाच खेळाडू आहेत स्पर्धेत
डंकन फ्लेचर यांची नजीकच्या काळात हकालपट्टी झाली तर त्यांच्या जागी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, अनिल कुंबळे, राहुल द्रविड, ऑस्ट्रेिलयाचा लेगस्पनिर शेन वॉर्न तसेच चेन्नई सुपरकिंग्जचे कोच आणि न्यूझीलंडचे माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग हे पाच माजी खेळाडू स्पर्धेत आहेत. या पाचही खेळाडूंनी कसोटी खेळणा-या सर्व देशांत दमदार प्रदर्शन केले असून या खेळाडूंच्या नावे बरेच विक्रम असल्याने हे खेळाडू स्पर्धेत आहेत.

स्टीफन फ्लेमिंग सर्वात पुढे
न्यूझीलंडचा माजी खेळाडू स्टीफन फ्लेिमंग भारतीय संघाचा प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. फ्लेमिंगने कर्णधार म्हणून ज्या पद्धतीने काम केले होते, ते शानदार होते. न्यूझीलंडमध्ये तो आतापर्यंत सर्वकालीन महान कर्णधार आहे. शिवाय फ्लेमिंगच्या मार्गदर्शनाखाली आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जने आतापर्यंत दमदार प्रदर्शन केले आहे.

सौरव गांगुली
*सौरव गांगुली म्हणजे विदेशात भारताला वजियाची सवय लावणारा कर्णधार म्हणून ओळखला जातो. सामन्यापूर्वी प्लॅनिंगवर गांगुलीचा जोर असतो. कर्णधार असतानासुद्धा तो सामन्यापूर्वी प्लॅनिंग करायचा.
* आक्रमक स्वभावाचा व्यक्ती आणि क्रिकेटपटू म्हणून गांगुलीला ओळखले जाते. त्याच्या आक्रमकतेचा टीम इंडियाला रणनीतीमध्ये फायदा होऊ शकतो.
* गांगुलीने आयपीएलमध्ये खेळाडू ते कोच अशी भूमिका पार पाडली आहे. गांगुलीच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा भारताला होऊ शकतो.

अनिल कुंबळे
* कधीही कोणत्याही वादात न पडलेला आणि शुद्ध चारित्र्याचा खेळाडू म्हणून कुंबळेकडे पाहिले जाते. जम्बो नावाने प्रसदि्ध असलेल्या कुंबळेची प्रतिमा स्वच्छ आहे. कुंबळेने भारताचे नेतृत्वसुद्धा केले आहे. आयपीएलमध्ये कुंबळेने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. कुंबळे कोच असताना त्याच्या मार्गदर्शनाखाली महान खेळाडू सचनि तेंडुलकरसुद्धा खेळला आहे.

राहुल द्रविड
* जवळपास २० वर्षे टीम इंडियाचा सदस्य म्हणून अनुभव. दौ-यावर टीमच्या अडचणींची सर्व माहिती असणारा खेळाडू द्रविड आहे. विदेशी खेळपट्ट्यांवर कसे खेळायचे, याचे ज्ञान द्रविडशिवाय कुणालाच नाही.
* भारताचा सर्वािधक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून द्रविडची ख्याती आहे. तंत्राच्या बाबत तो सचनि तेंडुलकरपेक्षा उजवा होता. शिवाय भारतीय संघातील युवा खेळाडूंशी संवाद साधताना द्रविडला अडचण जाणार नाही.
* स्वभावही शांत असून तो मनमिळाऊ वृत्तीचा आहे. द्रविड नेट प्रॅिक्टसवर खूप जोर देतो.