आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Cricket Team Number One Place In Trouble, Divya Marathi

भारताचे नंबर वनचे स्थान येणार धोक्यात, विंडीजविरुद्ध मालिका विजय गरजेचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : फ‍िरकीपटू अमित मिश्रा सोमवारी कोचीत पोहोचला.
कोची - टीम इंडिया वेस्ट इंडीजविरुद्ध वनडे मालिकेत दोन हात करणार असून भारताचे नंबर वनचे सिंहासन धोक्यात असेल. मालिका जिंकल्यास भारताचे नंबर वनचे सिंहासन कायम असेल. मात्र, वेस्ट इंडीजने धक्कादायक विजय मिळवल्यास भारताची दुस-या किंवा तिस-या स्थानी घसरण होईल. दोन्ही देशांदरम्यान पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला ८ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे.
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका सध्या संयुक्तपणे नंबर वनच्या खुर्चीवर विराजमान आहेत.
आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार भारताने ५-० ने मालिका जिंकली, तर टीम इंडिया आफ्रिकेला मागे टाकून एकटी नंबर वनच्या सिंहासनावर असेल. मालिका ४-१ ने जिंकली तरी नंबर वनचे स्थान कायम राहील. मात्र, याच वेळी ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला ३-० ने हरवले तर त्यांचे भारताइतकेच ११४ गुण होईल. याविरुद्ध वेस्ट इंडीज मालिकेतील तीन सामने जिंकून भारताला हरवले तर टीम इंडियाचे सिंहासन हातून जाईल. ऑस्ट्रेलियाच्या मालिकेवरही बरेच काही अवलंबून असेल.

सामन्यावर पावसाचे सावट
पहिल्या वनडेवर पावसाचे सावट आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोचीत बुधवारी पाऊस पडण्याची ५० टक्के शक्यता आहे. पावसाचा धोका लक्षात घेता मैदानावर अतिरिक्त कर्मचा-यांना तैनात केले जाईल, असे बीसीसीआयच्या खेळपट्टी समितीचे सदस्य तापस चटर्जी यांनी म्हटले. पाऊस थांबल्यानंतर सामना लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न होतील.

फलंदाजांना मिळणार मदत
वनडे क्रिकेट फलंदाजांचा गेम असतो. या खेळपट्टीकडूनही फलंदाजांना मदत मिळेल. सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना आणि नंतर फ‍िरकीपटूंना येथे फायदा होईल, असे तापस यांनी सांगितले.