आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian cricket team on verge of worst defeat ever

... तर 45 वर्ष जुना विक्रम मोडणार टीम इंडिया

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्‍या नेतृत्‍वाखाली टीम इंडियाने तब्बल 28 वर्षांनंतर विश्‍वचषक जिंकला आणि इतिहास निर्माण केला. आता याच धोनीच्‍या नेतृत्वाखाली भारतीय संघ कसोटी इतिहासातील सर्वात लाजिरवाण्‍या पराभवाच्‍या जवळ पोहोचला आहे. रविवारी संपलेल्‍या तिस-या कसोटीत भारताला डावाने पराभव स्‍वीकारावा लागला होता. याबरोबरच परदेशी भूमीवरील त्‍यांचा हा सलग सातवा पराभव ठरला. टीम इंडिया जर ऍडिलेड कसोटीत पराभूत झाली तर कसोटी इतिहासातील हा दारूण पराभव ठरेल.

भारतीय संघाच्‍या कसोटीतील 79 वर्षाच्‍या इतिहासात भारताने 461 सामने खेळले आहेत. यापूर्वी दोनवेळा भारताने सलग सात सामन्‍यात पराभव स्‍वीकारला आहे. 1967 मध्‍ये मन्‍सूर अलीखान पतौडीच्‍या नेतृत्‍वाखाली भारतीय संघाला इंग्‍लंडकडून 3-0 ने आणि ऑस्‍ट्रेलियाकडून 4-0 ने पराभव स्‍वीकारावा लागला होता. त्‍यापूर्वी 1958-59 मध्‍ये भारताचा वेस्‍ट इंडीज आणि ऑस्‍ट्रेलियात खेळण्‍यात आलेल्‍या पाच-पाच सामन्‍यांच्‍या मालिकेतील आठ सामन्‍यात पराभव झाला होता.
क्रिकेटमधून निवृत्ती घेण्‍यास लक्ष्‍मणचा स्‍पष्‍ट नकार