आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Cricketer Rohit Sharma In Kolkata For Test Match

रोहितला कसोटीत पदार्पण करण्याची नामी संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा सर्वांत युवा फलंदाज रोहित शर्मा पुन्हा एकदा नवा डाव सुरू करण्याच्या तयारीत आहे. गेल्या पाच एकदिवसीय सामन्यांत फटक्यांची आतषबाजी करून धावांचा वर्षाव करणार्‍या रोहितपुढे आता कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण हेच मुख्य लक्ष्य आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध येत्या सहा नोव्हेंबरपासून होणार्‍या मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी रोहित शर्माची निवड झाली आहे. सचिनच्या कारकिर्दीतील हा 199 वा सामना आहे. रोहितच्या कारकिर्दीत बरेच उतार-चढाव आले. 2007 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर 108 सामन्यांमध्ये त्याने 3,049 धावाच केल्या आहेत. यात एकूण चार शतकांचा समावेश आहे.

सध्या तो जबर फॉर्मात असल्यामुळे कर्णधार महेंद्रसिंग धोनी त्याला अंतिम एकादशमध्ये स्थान देऊ शकतो. अशात जर त्याने पदार्पणातच शतक झळकावले, तर तो विक्रम नोंदवणारा 14 वा भारतीय अन् 98 वा जागतिक फलंदाज ठरेल. भारतासाठी आजवर 14 फलंदाजांनी पदार्पणातच शतक ठोकले आहेत.
पदार्पणातच शतक झळकावणारे भारतीय : लाला अमरनाथ (1933), दीपक शोधन (1952), कृपाल सिंग (1955), अली बेग (1959), हनुमंत सिंग (1964), गुंडप्पा विश्वनाथ (1969), सुरिंदर अमरनाथ (1976), मोहंमद अझहरुद्दीन (1984), प्रवीण आमरे (1992), सौरव गांगुली (1996), वीरेंद्र सेहवाग (2001), सुरेश रैना (2010) आणि शिखर धवन (2013).