आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Cricketer Shikhar Dhawan Latest News In Marathi

टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनचा "विस्डेन' च्‍या 5 उत्‍कृष्‍ट क्रिकेटपटूंमध्‍ये समावेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - भारताचा आक्रमक सलामीवीर शिखर धवनचा "विस्डेन'कडून जाहीर करण्यात आलेल्या पाच सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. 2013 मध्ये केलेल्या कामगिरीचा आधारावर त्‍याचा यादीमध्‍ये समावेश करण्‍यात आला. 28 वर्षीय धवनने गेल्यावर्षी भारताला चॅंपियन्स करंडक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्याने 90.75 च्या सरासरीने पाच सामन्यांत दोन शतकांसह 363 धावा केल्या होत्या. "मालिकावीर' पुरस्काराचा मानकरीही ठरला होता.

निवृत्‍तीनंतर सचिन विस्डेनच्या मुखपृष्ठावर
मास्टर ब्लास्टर सचिन या वर्षीच्या "विस्डेन'च्या मुखपृष्ठावर झळकला आहे. "विस्डेन'च्या 151व्या आवृत्तीच्या मृष्टावर झळकलेला सचिन पहिलाच भारतीय आहे


"विस्डेन'चे पाच सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू
खेळाडू (देश)
शिखर धवन (भारत)
रेयान हॅरिस (ऑस्ट्रेलिया)
ख्रिस रॉजर्स (ऑस्ट्रेलिया)
ज्यो रूट (इंग्लंड)
चार्लोटी एडवर्डस (इंग्लंड )

‘लीडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड’ - डेल स्‍टेन
2013 चा विस्डेन 'लीडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड’ हा किताब देऊन गौरविण्‍यात आले. 2007 मध्‍ये जॅक कॅलीस नंतर हा किताब पटाकाविणा हा दक्षिण आफिकेचा दुसरा खेळाडू आहे.

पुढील स्‍लाइडवर क्लिक करा आणि वाचा 2013 मधील धवनीची कामगिरी