आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Cricketers Ahead Of Pakistanis In All Formats

सचिन तेडुलकरच जगातील सर्वोत्तम फलंदाज, आकडेवारीवरून झाले सिद्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- खेळताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे तेवढे दडपण नसायचे. परंतु, ब्रायन लारा फलंदाजीला असला तर त्याची जास्त भीती वाटायची, असे वादग्रस्त वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने केले होते.

या वर्षी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन या संघाकडून खेळलेल्या पॉंटिंगने आपल्या सहकारयावर शाब्दिक हल्ला चढविताना म्हटले होते, की सचिन आणि ब्रायन लारा दोघेही चांगले खेळाडू आहेत. परंतु, सचिनपेक्षा लाराने आपल्या संघाला विजयी करण्यात मोलाची भूमिका बजावलेली आहे. लारा फलंदाजीला आला, की कर्णधार या नात्याने माझी झोप उडायची. सचिनपेक्षा मला लाराची जास्त भीती वाटायची.

सचिनवर टीका करताना पॉंटिंग म्हणाला होता, की सचिनला बाद करण्याची योजना आखणे अतिशय सोपे होते. परंतु, लारासाठी आम्हीला कित्येकतास योजना आखण्यात घालवायचो. केवळ दीड तासांच्या खेळात लारा आमच्यापासून मॅच हिरावून घेत होता.

ब्रायन लारा एक चांगला खेळाडू होता. परंतु, आकड्यांचा विचार केल्यास सचिन त्यापेक्षा कितीतरी सरस असल्याचे दिसून येते. केवळ स्वस्त प्रसिद्धीसाठी खोटारड्या रिकी पॉंटिंगने सचिनवर घणाघाती टीका केल्याचे दिसून येते.


पुढील स्लाईडमध्ये बघा सचिन आणि लाराची तुलना करणारे आकडे