आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे क्रिकेटर फिक्सिंगमध्ये अडकूनही 'सुटले', खेळ सुटला तरी इतरत्र सेट झाले!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रीडा डेस्क- क्रिकेटर श्रीसंत आपल्या करिअरची नवी सुरुवात करत आहे. श्रीसंत आता एका टीव्ही चॅनेलवर शो होस्ट करताना दिसून येईल. आयपीएल-6 मध्ये स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाल्यानंतर श्रीसंतला क्रिकेटपासून दूर व्हावे लागले होते. श्रीसंतसह अनेक भारतीय क्रिकेटर्स यांच्यावर फिक्सिंगचे आरोप झाले आहेत. त्या खेळाडूंचे क्रिकेट करिअर संपले मात्र इतर क्षेत्रात पाऊल टाकले व तेथे एक सेलिब्रेटी म्हणून त्यांचे स्वागत झाले. हे खेळाडू क्रिकेटमध्ये जेवढे यशस्वी झाले तेवढेच दुस-या क्षेत्रातही यशस्वी झाले आहेत. त्याचा क्रिकेट खेळ सुटला असेल पण करिअर मात्र सावरले असेच म्हणावे लागेल. कोणी मनोरंजन इंडस्ट्रीत सक्रिय आहे तर कोणी राजकारणात. तर काही क्रिकेट एक्सपर्ट म्हणून काम पाहत आहेत. श्रीसंत त्याचे सर्वात ताजे उदाहरण आहे.
आयपीएल-6 मध्ये श्रीसंतवर स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाले होते. 9 मे 2013 रोजी पंजाब आणि राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान राजस्थानच्या खेळाडूंना श्रीसंतने पूर्व नियोजित पद्धतीने एका षटकात 14 धावा दिल्या होत्या. 16 मे रोजी त्याला स्पॉट फिक्सिंग आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मात्र, महिन्याभरानंतर त्याला जामीनावर सोडून देण्यात आले होते. बीसीसीआयने त्याच्यावर आयुष्यभरासाठी बंदी घातली आहे.
श्रीसंतची नवी खेळी सुरु- क्रिकेटपासून दूर गेल्यानंतर श्रीसंत आता एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत आपले नशीब अजमावत आहे. 2014 मध्ये त्याने डान्स रियालिटी शो ‘झलक दिखला जा-7’ मध्ये भाग घेतला होता. आता तो एक टीव्ही होस्ट म्हणून आपल्याला दिसेल.
श्रीसंत सहित अनेक क्रिकेटर्स यांच्यावर फिक्सिंगचे आरोप झाले आहेत.. टाकूया त्यावर एक नजर...
बातम्या आणखी आहेत...