आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Eves Lose To Korea In Asia Cup Semis, WC Dream Ends

आशिया चषकांत कोरियाने केले महिला हॉकी संघाला पराभूत, वर्ल्‍डकपच्‍या आशा मावळल्‍या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्‍वालालंपूर- पुढच्‍या वर्षी होणा-या विश्‍वचषकात स्‍थान मिळवण्‍याचे भारतीय महिला हॉकी संघाचे स्‍वप्‍न संपुष्‍टात आले आहे. आठव्‍या महिला अशिया चषक टुर्नामेंटच्‍या सेमीफायनलध्‍ये कोरियाने भारताला 1-2ने पराभूत केले.

कोरियाने सुरूवातीलाच दोन गोल केल्‍यामुळे भारताला सामन्‍यात पुनरागमन करताच आले नाही. तरीसुद्धा सामन्‍यात पुन्‍हा परतण्‍याचा त्‍यांनी पुरेपूर प्रयत्‍न केला. 41व्‍या मिनिटाला भारताच्‍या रितू राणीने गोल करून सामन्‍यात आघाडी घेण्‍याच्‍या आशा जागवल्‍या होत्‍या. हेग येथे पुढीलवर्षी होणा-या विश्‍वचषकांत स्‍थान मिळवण्‍यासाठी भारताला या सामन्‍यात कोणत्‍याही परिस्थितीत विजय आवश्‍यक होता.