आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिस्बेनला भारतीय खाद्यपदार्थांची रेलचेल, खेळाडूंचा उपवास संपला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीयांच्या मानसिकतेशी भोजनाची पसंती आणि परिपूर्णता एकत्र साधली गेली आहे. भारतीय क्रिकेटपटूही या गोष्टीला कसे अपवाद ठरतील? ब्रिस्बेनमध्ये एकदिवसीय क्रिकेट सामन्यासाठी आल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंच्या ब्रिस्बेन कसोटीदरम्यानच्या कटू आठवणी जाग्या झाल्या.

कसोटीदरम्यान भारतीयांना आवडीचा शाकाहारी आहार दिला गेला नव्हता. या वेळी मात्र विश्वचषक क्रिकेट स्पर्धा व बीसीसीआयचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील स्थान ओळखून ब्रिस्बेन क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिका-यांनी भारतीयांसाठी अक्षरश: पायघड्या अंथरल्या आहेत. शाकाहारी अन्नपदार्थ देतानाही या अधिका-यांनी अधिक सुबत्ता दाखवली आहे. शाकाहारी खाद्यपदार्थांची अक्षरश: रेलचेल होती. भारतीय क्रिकेटपटू या वेळी ब्रिस्बेनमध्ये तरी तृप्त मनाने ढेकर देत आहेत.