इंचियोन - भारतीय फुटबॉल संघाला आशियाई स्पर्धेच्या सलामी सामन्यात धडाकेबाज विजयाची लय कायम ठेवता आली नाही. यजमान दक्षिण काेरियाने गुरुवारी झालेल्या सामन्यात भारतावर १०-० अशा फरकाने एकतर्फी विजय संपादन केला. भारताचा स्पर्धेतील हा पहिला पराभव ठरला. याशिवाय कोरियाने अ गटात शानदार विजय मिळवून गुणतालिकेत सहा गुणांसह अव्वल स्थान गाठले. या गटात भारत तीन गुणांसह दुस-या स्थानावर आहे.
यू यंग (९, ४५, ६३, ६५ मि.), जेओन गा-इएल (७, ४०, ६१ मि.) आणि जुंग सेऊल-बिन (४९, ७९ मि.) यांनी केलेल्या गाेलच्या बळावर दक्षिण कोरियाने घरच्या मैदनावर माेठ्या फरकाने एकतर्फी विजय साकारला. याशिवाय पार्क ही यंगने संघाच्या विजयात एका गोलचे याेगदान दिले. भारताला शेवटपर्यंत एकही गाेल करता आला नाही. यापूर्वी भारताने सलामी सामन्यात मालदीवचा १५-० ने पराभव केला होता.