आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Football Team Beat Pakistan, News In Marathi

भारताने पारंपरिक प्रतिस्‍पर्धी पाकिस्‍तानला फुटबॉल केले नामोहरन!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोओळ - गोल नोंदवताना भारताचा रॉबीन (निळा टी शर्ट)
बंगळुरू - भारताने रविवारी मैत्रीपूर्ण फुटबॉल लढतीत पाकिस्तानला 1-0 ने पराभूत केले. या विजयासह भारताच्या 23 वर्षांखालील संघाने दोन सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली. दुसरी लढत 20 ऑगस्ट रोजी होईल.

लढतीत 44 व्या मिनिटाला रॉबिन सिंगने एकमात्र गोल केला. त्याने कर्णधार सुनील छेत्रीच्या क्रॉस हेडरवर हा शानदार गोल नोंदवला. रॉबिनचा हेडर गोलपोस्टवर लागला. मात्र चेंडू गोल रेषेच्या आत गेल्याने भारताला जल्लोषाची संधी मिळाली.
दहा खेळाडूंसह खेळला भारत
रॉबिनसिंहला 69 व्‍या मिनिटाला दुसरे पिवळे कार्ड दाखवण्यात आल्‍याने त्‍याला मैदान सोडावे लागले. दहा खेळाडूंसह खेळणा-या भारतीय फुटबॉल संघाने पारंपरिक प्रतिस्‍पर्धी संघाला एकही गोल करु दिला नाही.
भारत आणि पाकिस्‍तान यांच्‍यामध्‍ये यापूर्वी 2005 मध्‍ये फुटबॉल सीरीज खेळली गेली होती. तेव्‍हापासून उभय देशांमध्‍ये फुटबॉल लढती झाल्‍या नाहीत. सध्‍यस्थितीत आ‍गामी दक्षिण कोरियाच्‍या इंचियोनमध्‍ये होणा-या आशियायी खेळांची तयारी म्‍हणून या मैत्रीपूर्ण लढतीचे आयोजन करण्‍यात आले होते.
पुढील स्‍लाइडवर पाहा सामन्‍यादरम्‍यानची छायाचित्रे..